वसंत सहकारी साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती

यवतमाळ : वसंत सहकारी साखर कारखाना लि., पुसद आणि भैरवनाथ शुगर वर्क्स लि., वसंतनगर-पोफाळी येथे विविध पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी आणि उत्पादन विभागांतील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अभियांत्रिकी विभागात टर्बाइन इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअर, मिल टर्बाइन अटेंडंट, बॉयलर अटेंडंट (प्रथम व द्वितीय श्रेणी), फायरमन आणि बॉयलर वॉटरमन या पदांचा समावेश आहे. उत्पादन विभागात डेप्युटी चीफ केमिस्ट/सीनियर केमिस्ट, केमिस्ट, लॅब इन्चार्ज, पॅन इन्चार्ज, पॅनमन, असिस्टंट पॅनमन तसेच सेंट्रीफ्यूगल ऑपरेटरची पदे उपलब्ध आहेत.
साखर कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा पाच ते सात वर्षांचा अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांनी शिक्षण, वय, पूर्वानुभव, सध्याचे वेतन आणि अपेक्षित वेतन यांची माहिती अर्जात नमूद करावी.
शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रतींसह कारखाना साइटवर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. निवड झालेल्या उमेदवारांना कामावर तातडीने रुजू व्हावे लागेल.




