सीताराम महाराज कारखान्यात १७ जागांसाठी भरती

पंढरपूर : खर्डी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सीताराम महाराज साखर कारखाना लिमिटेडच्या डिस्टिलरी विभागात विविध पदांच्या एकूण १७ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.
कारखान्यास ऑफिस क्लार्क आणि वेअरहाउस अटेंडंट प्रत्येकी एक, तर हेल्परच्या १५ जागा भरावयाच्या आहेत.
ऑफिस क्लार्क पदासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, मराठी व इंग्रजी टायपिंग तसेच संगणकाचे ज्ञान अपेक्षित आहे. वेअरहाउस अटेंडंट पदासाठी बारावी उत्तीर्ण आणि तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. हेल्पर पदासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण अनुभवी तसेच नवोदित उमेदवार अर्ज करू शकतात.
कारखान्याची गाळप क्षमता ५ हजार मेट्रिक टन असून, १८ मेगावॅटचा सहवीज निर्मिती प्रकल्प आणि ११० केएलपीडी क्षमतेचा ज्यूस टू इथेनॉल डिस्टिलरी प्रकल्प आहे.
इच्छुकांनी एकूण अनुभव, शैक्षणिक पात्रता, सध्याचा पगार, अपेक्षित पगार, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद केलेला बायोडाटा hr.smskl@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. दिवसांच्या आत अर्ज पाठविण्याचे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.




