ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

धुळे : गळीत हंगामासाठी ऊसतोडणी व वाहतुकीचे मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन एका ऊस वाहतूकदाराची १२ लाख ३३ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सोमनाथ संतोष भिल आणि प्रवीण शंकर भिल (दोघे रा. गरताड, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत खटाव येथील श्रीकृष्ण पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, संशयितांनी २०२५–२६ च्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी व वाहतुकीसाठी १५ मजूर जोड्या, म्हणजेच ३० मजूर उपलब्ध करून देण्याची हमी दिली होती. त्यासाठी त्यांनी पाटील यांच्याकडून १२ लाख ३३ हजार ८०० रुपये घेतले. मात्र, आश्वासनानुसार मजूर उपलब्ध करून न दिल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी भिलवडी पोलिस ठाण्यात दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »