कंचेश्वर शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

उत्तर सोलापूर : तिऱ्हे येथील कंचेश्वर शुगर लिमिटेडच्या साखर कारखाना आणि २६ मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी इंजिनिअरिंग विभागातील विविध पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता ६,००० मेट्रिक टन आहे.

भरतीसाठी खालील पदांची जाहिरात देण्यात आली आहे:

बॉयलर फायरमन: सेकंड क्लास बॉयलर अटेंडंट परीक्षा उत्तीर्ण.
वॉटरमन: दहावी, बारावी किंवा आयटीआय.
बॉयलर पंपमन: दहावी, बारावी किंवा आयटीआय.

प्रत्येक पदासाठी संबंधित कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

इच्छुक पात्र उमेदवारांनी एकूण अनुभव, शैक्षणिक पात्रता, सध्याचा व अपेक्षित पगार, मोबाइल क्रमांक आणि मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत Kancheshwarsugartirhe@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »