जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही ऊस वाहतूक सुरू; गाड्या फोडण्याचा ‘प्रहार’चा इशारा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नेवासा, अहिल्यानगर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही साखर कारखानदारांकडून ऊस वाहतूक सुरू असल्याचा आरोप करत प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. वाहतूक तातडीने थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शेतकरी नेत्यांनी सोमवारी (ता. २३) काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांना ऊसतोडणी व गाळपाबाबत निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, मंगळवारी (ता. २४) ऊस वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने कारखानदार आदेशाला जुमानत नसल्याचा आरोप प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

“प्रशासनाच्या आदेशाला किंमत काय?” असा सवाल करत त्यांनी कारखानदारांनी ऊस वाहतूक बंद करावी, अशी मागणी केली. वाहतूक सुरूच राहिल्यास गाड्या फोडण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे, बालासाहेब खरात, युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग ओताडे, तालुकाप्रमुख अशोक आगळे आणि दिलीप पाटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »