कोल्हापूर भागातील गाळप हंगामाचा साखर आयुक्तांडून आढावा
कोल्हापूर : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या सर्व कार्यकारी संचालकांची बैठक घेऊन गाळप हंगामाचा आढावा घेतला.
या सभेमध्ये झालेले गाळप, यापुढे होणारे गाळप झालेले पेमेंट, शासकीय येणी वसुली, पुढील वर्षाच्या गाळप हंगामाची संभाव्य स्थिती, कारखान्यांच्या अडीअडचणी, तोडणी मशीन खरेदीबाबतची शासकीय योजना, ऊस तोडणी यंत्रणेकडून होणारी फसवणूक, इथेनॉल पुरवठ्यामधील अडीअडचणी वगैरे विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
साखर आयुक्तांनी आता कारखान्यांनी भविष्याचा वेध घेऊन दीर्घ मुदतीचे नियोजन करून कामाला लागणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विभागवार कारखान्यांमध्ये मॅपिंग करण्याची गरज असल्याचे सांगितले.
प्रोफेसर ही उपाधी व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन यांचा ‘सर सन्मान’ जाहीर झाल्याबदल सर्व साखर कारखान्यांच्या वतीने शेखर गायकवाड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.