शेखर गायकवाड यांचा शनिवारी सत्कार

‘भूमाता’ आणि ‘शुगरटुडे’च्या वतीने ऋणनिर्देश समारंभ
पुणे : महाराष्ट्राच्या प्रशासनात आपला वेगळा ठसा उमटवणारे, ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा, सेवानिवृत्तीनिमित्त शनिवारी (२० मे) हृद्य सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ, कृषिमहर्षी डॉ. बुधाजीराव मुळीक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
कृषी, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव काम करणारी भूमाता संस्था, शुगरटुडे मॅगेझीन आणि छत्रपती उदयनराजे महाराज साहेब फाउंडेशनच्या वतीने गायकवाड यांच्या लोकाभिमुख प्रशासकीय सेवेच्या सन्मानार्थ या ‘ऋणनिर्देश’ समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २० मे २०२३ रोजी पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या डॉ. शिरनामे सभागृहात सकाळी ११ वाजता होईल, असे ‘शुगरटुडे’चे संपादक नंदकुमार सुतार यांनी कळवले आहे.
यानिमित्ताने शेखर गायकवाड यांच्यावर ‘शुगरटुडे’चा विशेष अंकदेखील प्रकाशित होणार आहे. श्री. गायकवाड या महिन्याच्या अखेरीस (३१ मे) सेवानिवृत्त होत आहेत.