निरा-भीमा कारखान्यावर आत्मक्लेष आंदोलन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांनी गाळप उसाचे थकीत बिल मिळण्याबाबत बुधवारी कारखान्याच्या गेटवर पदयात्रा काढून आत्मक्लेष दोन तास आंदोलन केले.

लाखेवाडी गावातील जय भवानी मंदिरापासून हे आंदोलन सुरू झाले. निरा- भीमा साखर कारखान्याच्या गेटवर जाण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना रोखल्याने सुमारे दीड तास शेतकरी व पोलिस प्रशासनामध्ये खडाजंगी सुरू होती. काही शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले.

आंदोलनाचे प्रमुख पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांनी दिलेल्या उसाचे बिल पाच महिने उलटून गेले तरीदेखील दिले नाही. ते तातडीने द्यावे तसेच कारखान्यातील कामगारांचा थकीत पगारही लवकरात लवकर द्यावा, अशी आमची मागणी आहे.

या वेळी श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, प्रशांत पाटील, प्रतापराव पाटील, पंडितराव पाटील, महादेव घाडगे, अजित टिळेकर, विजय घोगरे यांच्यासह शेतकरी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात उतरले होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »