‘शून्य टक्के मिल बंद तास’वर परिसंवाद

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर उद्योगतील प्रथितयश सल्लागार डब्ल्यू. आर. आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर “शून्य टक्के मिल बंद तास’’ या संकल्पनेची अंमलबजावणी या विषयावर परिसंवाद संपन्न झाला.

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर यांनी आयोजित केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी टेक्निकल स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत श्री. आहेर यांचे रविवारी व्याख्यान आयोजित केले होते.

कारखान्याचे संचालक विलासराव राऊत यांनी प्रास्ताविक केले आणि श्री. ‌आहेर यांचा सत्कार केला. श्री. रासकर यांनी कामगारांना विषयाचे महत्त्व समजावून सांगितले.
नंतर श्री. ‌आहेर यांनी कारखाना सुरू असताना मिल बंद झाल्यावर कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान होते, हे आकडवारीनिशी समजून सांगितले.

यावर उपाययोजना म्हणून “शून्य टक्के मिल बंद तास’ या संकल्पनेची अंमलबजावणी याविषयी शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली आणि किमान पाच टक्के ‘स्टॉपेजेस’ आपण सुयोग्य नियोजन करून अनलोडर ते शुगर ग्रेडर पर्यंतचे ऑफ सिझन मध्येच कसोशीने मेंटेनन्स करून वेळेचे, कामगारांचे, स्पेशल पार्टचे आणि व्यवस्थापनातर्फे आर्थिक नियोजन करून आपण साखर कारखान्यावर “शून्य टक्के मिल बंद तास’’ या संकल्पनेची अंमलबजावणी करू शकतो आणि कारखान्याचे आर्थिक नुकसान टाळता येते.

त्यामुळे मिलची कार्यक्षमता सुधारते. तसेच वेळेची बचत होऊन उत्पादनात वाढ होते, असे विविध उदाहरणे आणि आकडेवारीसह सांगितले.

W R Aher

दुपारच्या सत्रात श्री. आहेर यांनी हाय प्रेशर बॉयलरची चालू असताना घ्यावयाची काळजी आणि ‘ऑफ सीझन’ मध्ये करावयाचे मेंटेनन्स शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी काही टिप्स दिल्या. शेवटी झालेल्या सत्रात या विषयावरील विविध प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरे श्री. आहेर यांनी दिली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »