दोन वर्षांत नऊशे हार्वेस्टर दिमतीला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : ऊसतोडणीचा जटील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने यांत्रिक तोडणीवर यापुढे अधिक भर राहणार आहे, येत्या दोन वर्षांत ९०० हार्वेस्टर यंत्रे महाराष्ट्रातील ऊस उद्योगाच्या सेवेत रूजू होतील.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. हार्वेस्टर अनुदानाबाबतचे परिपत्रक शासनाने गेल्या महिन्यात जारी केल्यानंतर खरेदी प्रक्रियेला गती मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये एका यंत्रासाठी अधिकतम रूपये ३५ लाखांचे अनुदान देय राहणार आहे. त्यामुळे अनेक साखर कारखाने आणि संस्था हार्वेस्टर खरेदीसाठी पुढे आल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत ९०० हार्वेस्टर खरेदी उद्दिष्ट पूर्ण होईल.

यंदा नवे १५० हार्वेस्टर साखर उद्योगाच्या सेवेत दाखल झाले. त्यातील तब्बल ८० हार्वेस्टर यंत्रे एकट्या लातूर भागामध्ये खरेदी करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे दीडशे हार्वेस्टर खरेदीचा वेग होता. आता तो नव्या धोरणामुळे वाढेल, अशी आशा आहे.

हार्वेस्टर खरेदी अनुदान धोरण अधिवेशन संपताच जाहीर होणार, असे वृत्त ‘शुगरटुडे’ने सर्वात आधी दिले होते.

आधीचे वृत्त

हार्वेस्टरसाठी ३५ लाखांचे अनुदान, शासन आदेश जारी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »