‘श्रीपती शुगर’चा गळीत हंगाम सुरू, स्व. पतंगराव कदम यांचे स्वप्न पूर्ण

आवडल्यास ही बातमी शेअर करा


सांगली : श्रीपती शुगर अँड पॉवर लिमिटेड (डफळापूर, ता. जत जि. सांगली) या साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम शुभारंभ आज (१९ जानेवारी) पार पडला.

माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे श्रीपती शुगर हे एक स्वप्न होतं. ही स्वप्नपूर्ती होत आहे. या कारखान्यामुळे या भागातील ऊस तर गाळप होणारच आहे पण त्याचबरोबर या भागात रोजगार सुध्दा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

या कारखान्याची उभारणी १ ऑगस्ट २०२० रोजी स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम यांचे प्रेरणेतून झाली असून, कारखान्याची प्रती दिन गाळप क्षमता २५०० मे. टन इतकी आहे. तसेच, १२ मेगावॉट सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्याच बरोबर आगामी काळात केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणानुसार, आसवनी प्रकल्पसुद्धा कारखान्यामार्फत सुरु करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीमध्ये जत व कवठे महांकाळ तालुक्यामध्ये १४,००० हेक्टर क्षेत्रावरती ऊस लागवड आहे. या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांना वेळत ऊस गाळप करण्याची सतत चिंता सतावत होती. या कारखान्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी यांचा ऊस गाळपाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

तसेच या कारखान्यामुळे दोन्ही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होणेस मदत होणार आहे. त्याचप्रमाणे रोजगार निर्मीतीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस लागवडी संदर्भात सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणेसाठी कारखाना ऊस विकास कार्यक्रम राबविणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे ऊस लागवडी क्षेत्र वाढण्यास मदत होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »