जय हरी ‘विठ्ठल’; वजन काटा ओके

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्याची वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर, सर्व वजनकाटे बरोबर असल्याचा निर्वाळा भरारी पथकाने दिला.
शेतकऱ्यांना उसाचा काटा कुठूनही करून घेऊ द्या, शेतकऱ्यांच्या उसाचा काटा आमच्याकडे योग्यच राहील, असा विश्वास चेअरमन अभिजित पाटील यांनी दिला होता.
त्यावर १७ जानेवारी रोजी वैधमापन पथकाने अचानक भेट देऊन वजनकाट्याची तपासणी केली असता वजनकाट्यात कोणतीही तफावत अथवा गैरप्रकार आढळला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वैधमापन विभागाच्या तपासणीत कारखान्यावरील काट्यावर कोणताही गैरप्रकार, वजनात तफावत नसल्याचे आढळून आल्याचे प्रभारी कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी सांगितले.