चार लाख हेक्टर ऊस क्षेत्र वाढणार : साखर आयुक्त

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जरंडेश्वर, दौंड शुगर सर्वात मोठे कारखाने

‘डीएसटीए’ परिसंवाद

पुणे : विदर्भात ऊस पीक वाढावे यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत, नागपुरात ऊस संशोधन केंद्र सुरू होत आहे. परिणामी पुढील हंगामात ३ ते ४ लाख हेक्टर ऊस क्षेत्र वाढणार आहे, अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असो. च्या (डीएसटीए) परिसंवादात साखर आयुक्त बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आणि एस. एस. इंजिनिअयर्सचे चेअरमन एस. बी. भड, ‘प्राज’चे अतुल मुळे, गौरी पवार, श्री. बोकारे आदींची उपस्थिती होती.

पूर्वी नारळाला कल्पवृक्ष मानले जाई, मला वाटते ऊस हा आजचा कल्पवृक्ष आहे. त्याचा कोणताही भाग वाया जात नाही. मात्र उसाचे क्षेत्र वाढायला हवे. सध्या जेमतेम १६ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक आहे. त्यात वाढ करण्यासाठी आम्ही नागपूरजवळ गोसीखुर्द येथे शंभर एक जमीन घेतली आहे. तेथे व्हीएसआयचे ऊस संशोधन केंद्र सुरू करत आहोत, असे साखर आयुक्त म्हणाले.

विदर्भात मुबलक प्रमाणात पाणी आहे. धरणे भरलेली असतात, जर इकडच्या भागात एवढा पाणीसाठा असता, तर एखाद्या शेतकऱ्याने पन्नास किमीची पाइपलाइनसुद्धा केली असती, असे सांगून साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, ‘या पाण्याचा योग्य वापर केल्यास विदर्भातील ऊस क्षेत्र तब्बल चार लाख हेक्टरनी वाढणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पुढच्या हंगामात आपल्याकडे, म्हणजे महाराष्ट्रातील ऊस पीक क्षेत्र २० लाख हेक्टरवर जाईल असा आमचा अंदाज आहे.’

जरंडेश्वर, दौंड शुगर सर्वात मोठे कारखाने
उसाचे एवढे क्षेत्र वाढले, तरी गाळप हंगाम मात्र कमी होत जाईल. कारण आपण गाळप क्षमता वाढीला उदार दृष्टीकोनातून परवाने देत आहोत. पुढील वर्षी आणखी ४० हजार टनांनी राज्याची गाळप क्षमता वाढेल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.

राज्यात आता दौंड शुगर आणि जरंडेश्वर कारखाना प्रति दिन २० हजार टन गाळप क्षमतेसह सर्वात मोठे साखर कारखाने ठरले आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले.

‘प्रेझेंट अँड फ्युचर ऑफ इथेनॉल, बायोसिरप अँड फ्युचर झेडएलडी टेक्नॉलॉजीस’ या परिसंवादाचा विषय होता. डीएसटीएच्या तज्ज्ञांनी यावेळी सादरीकरण केले.
बोकारे यांनी आभार मानले.

हेदेखील वाचा
राज्याच्या गाळप क्षमतेत दीड लाख टनांची वाढ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

2 Comments

  1. Agriculture is Back Bone of India but the farmer’s back bone is cracked due to non viability of agriculture .Reasons are Fertilizer cost ,Labour cost , Transport cost and Climate conditions . Regarding Cane crop all vegitables which are short time period market price of vegitables are more than 20 to 40 rupees per kg , where as long term crop Sugar cane price is 2.50 to 3.50 rupees per kg . How and what is wrong with cane crop . Think and act accordingly .

Leave a Reply

Select Language »