कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग खानखोजे

आज आज बुधवार, जानेवारी १८, २०२३ रोजीचे
पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज पौष २८, शके १९४४
सूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२३
चंद्रोदय : ०४:२९, जानेवारी १९ चंद्रास्त : १४:४१
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि :एकादशी – १६:०३ पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – १७:२३ पर्यंत
योग : वृद्धि – ०२:४७, जानेवारी १९ पर्यंत
करण : बालव – १६:०३ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०२:४५, जानेवारी १९ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : १२:४९ ते १४:१२
गुलिक काल : ११:२५ ते १२:४९
यमगण्ड : ०८:३८ ते १०:०२
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:२७ ते १३:११
अमृत काल : ०७:३५ ते ०९:०५
वर्ज्य : २२:३० ते २३:५७
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
- श्री हरिवशं राय बच्चन
२००३: हिंदी साहित्यिक आणि कवी पदमभूषण हरिवंशराय बच्चन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)
क्रांतिकारक आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग खानखोजे –
‘आईवरी विपत्ती, आम्ही मुले कशाला? बंदीत मायभूमी आम्ही खुले कशाला?’ असा विचार करून खानखोजे यांनी स्वत:चे लग्न टाळले आणि लोकमान्यांच्या सल्ल्यानुसार सैनिकी शिक्षण घेण्यासाठी ते जपानला गेले.
पांडुरंग खानखोजे यांना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा दिली. १९०८ सालापासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गेल्यावर त्यांनी गदर पक्ष स्थापन करण्यात पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून प्रयत्न केले. १९११ साली खानखोजे अमेरिकेत गेले व त्यांनी ओरेगन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले. अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. पांडुरंग खानखोजे मेक्सिकोत गेले.
१९२० सालापासून ते १९४७ सलापर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.
या काळात हायब्रीड मका, तांब्या रोगाला तोंड देणारा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याचे उत्पादन, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, आदींवर संशोधन करून मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली.
मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषिसंचालक म्हणून नेमले होते. मेक्सिकोतील शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या भिंतीवर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व इतर थोर व्यक्तींच्या भव्य भित्तीचित्रांच्या पंक्तीत डॉ.खानखोजे यांचे म्यूरल असून चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश भाषेत ‘आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल’ असे लिहिले आहे.
पांडुरंग खानखोजे यांना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा दिली. १९०८ सालापासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गेल्यावर त्यांनी गदर पक्ष स्थापन करण्यात पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून प्रयत्न केले.
आपण शेतीसंबंधी जे ज्ञान मिळवले ते भारतीयांच्या कामाला यावे अशी तीव्र इच्छा खानखोजे यांना होती. पण भारत स्वतंत्र व्हावा ही इच्छा त्याहीपेक्षा तीव्र असल्याने त्यांनी शाळेत असल्यापासून विद्यार्थ्यांची संघटना बनवून ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार केले.
मग त्यांनी जपान, अमेरिका, जर्मनी आणि मेक्सिकोत जाऊन तेथेही हे कार्य त्यांनी चालू ठेवल्याने ते भारतात परतले तर त्यांना पकडून तुरुंगात डांबायला ब्रिटिश सरकार टपले होते. त्यामुळे जरी त्यांचे भाऊ,आई व वडील वारले तरी त्यांना भारतात परत येता आले नाही. शिवाय त्यांच्याकडे भारतात परत यायला ब्रिटिश पासपोर्टही नव्हता.
भारताला स्वातंत्र मिळाल्यावर, १९४९ साली तेव्हाच्या मध्यप्रांताचे कृषिमंत्री रा. कृ. पाटील यांनी मध्य प्रांतातील शेती सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धती, सहकारी शेती याचा अवलंब करण्यास कितपत वाव आहे हे पाहण्यासाठी डॉ. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी समिती नेमून त्यांना भारतात बोलावले.
त्यांनी आपल्याकडे दिले जाणारे शेतीचे शिक्षण किती उपयोगाचे आहे, त्यात संशोधनास किती वाव आहे, शेतीवर काही प्रयोग करण्यासाठी प्रायोगिक शेते आहेत का, शेतीतील सुधारणा खेडोपाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची काही सोय केली आहे का, शेतीचे यांत्रिकीकरण करणे इष्ट आहे का, अल्पभूधारकांनी सहकारी तत्त्वावर शेती करावी का हे सगळे ठरवण्यासाठी भारतभर हिडून शेतीचे निरीक्षण केले.
२८९ शेतकरी व ८२ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांनी सामूहिक शेतीचे प्रयोग सुरू करण्याचे सुचविले.हिंदी-मराठीत० पुस्तिका काढायचेही सुचविले.पण मेक्सिकोमध्ये खानखोजे यांना जेवढे काम करता आले तेवढे भारतात करता न आल्याने ते असंतुष्ट राहिले.
• १९६७ : कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन. (जन्म : ७ नोव्हेंबर, १८८४)
घटना :
१७७८: कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.
१९११: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
१९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात १० लोक ठार, २५० जखमी, दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू लावण्यात आला.
१९६४: न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.
१९७४: इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.
१९९७: नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.
१९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
२००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.
• मृत्यू :
• १९४७: भारतीय अभिनेता आणि गायक के. एल. सैगल उर्फ कुंदनलाल सैगल यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०४)
• १९७१: भारतीय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन. (जन्म : २५ सप्टेंबर १९२२)
• १९९३: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचे निधन. (जन्म: १२ मे , १९०५)
• १९९६: अभिनेते आणि राजकीय नेते पद्म श्री नन्दमूरि तारक रामाराव ( एन. टी. रामाराव ) यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२३)
जन्म :
१७९३: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १८४७)
१८४२: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)
१८८९: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांचा जन्म. ( मृत्यू: १ ऑक्टोबर , १९३१)
१८८९: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर, १९७५ )
१८९५ : साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे, १९७८)
आपला दिवस मंगलमय जावो
- वासुदेव डोंगरे, संजीव वेलणकर