साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी कार्यभार स्वीकारला

पुणे : नवनियुक्त साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी सोमवारी पदाचा कार्यभार स्वीकारला. संचालक यशवंत गिरी, डॉ. केदारी जाधव, सहसंचालक अविनाश देशमुख, कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे, आयुक्तालयातील सहसंचालक महेश झेंडे आदींनी त्यांचे स्वागत केले.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी राहिलेले सालिमठ यांची साखर आयुक्तपदी बदलीचे आदेश शासनाने १८ फेब्रुवारी रोजी काढले होते. मावळते साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार बदलीच्या ठिकाणी म्हणजे नवी मुंबईत सिडको सहव्यवस्थापकीय संचालकपदी रुजू झाल्याने, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे तात्पुरता अतिरिक्त पदभार दिला होता.
साखर आयुक्त हे पद खूप महत्त्वाचे आहे. या उद्योगात दरवर्षी सुमारे एक लाख कोटी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे या पदावरील अधिकाऱ्याला पूर्ण कालावधी मिळणे आवश्यक आहे; परंतु शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. अपवाद वगळता साखर आयुक्तांना कामासाठी पूर्ण कालावधी मिळत नाही. नवे आयुक्त सालिमठ यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा, अशी साखर उद्योगाची अपेक्षा आहे. असे झाले, तरच साखर उद्योगासमोरील अडचणींचा निपटारा करणे शक्य होईल.

‘शुगरटुडे’च्या वतीने नवीन साखर आयुक्तांना खूप खूप शुभेच्छा!