यंदा 921 लाख टन गाळप, ८८.५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : आगामी गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये एकूण ९२१ लाख टन ऊस गाळप अपेक्षित आहे, असा अंदाज साखर आयुक्तालयाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तसे झाल्यास आगामी हंगामातील ऊस गाळप सुमारे १३२ लाख मे. टनांनी कमी राहील.

ऊस हंगामाची तारीख निश्चित करण्यासाठी येत्या १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत मंत्री समिती बैठक निश्चित झाली आहे. त्यानिमित्ताने समितीसमोर सादर करण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे, असे सूत्रांकडून समजले. १ नोव्हेंबरचीच शिफारस अहवालातदेखील करण्यात आली आहे.

या अहवालात म्हटले आहे की,आगामी गाळप हंगामासाठी १४.०७ लाख हेक्टरवर ऊस उभा आहे. त्यातील खोडवा क्षेत्र ५.१३ लाख हेक्टर आणि नियमित लागण क्षेत्र ८.९४ लाख हेक्टर आहे. खोडवा उसाची उत्पादकता सुमारे ६० मे. टन प्रति हेक्टर गृहित धरून ३०७ लाख मे. टन ऊस उत्पादन होईल, तर नियमित लागण क्षेत्राची उत्पादकता सुमारे ८० मे. टन प्रति हेक्टर गृहित धरून ७१५लाख मे. टन ऊस उत्पादन होईल. दोन्ही मिळून सुमारे १०२२ लाख मे. टन ऊस उत्पादन अपेक्षित धरले आहे.
यातील ९० टक्केच ऊस गाळपासाठी येणार, असे गृहित धरले असता, यंदा ९२१ लाख मे . टन गाळप अपेक्षित आहे आणि सुमारे १०३ लाख मे. टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजे सरासरी उतारा ११.२५ प्रमाणे गृहित धरला आहे.

या साखर उत्पादनापैकी १५ लाख मे. टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवली जाऊ शकते, ती वजा जाता पुढील हंगामात ८८.५ मे. टन निव्वळ साखर उत्पादन गृहित धरण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »