…तर उसाला प्रति टन १० हजार रुपये दर द्यावा लागेल : डॉ. मुळीक
पुणे : ऊस पिकाच्या बहुपयोगी गुणधर्मांचा लाभ सर्व जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घेत असतात, आपलं नशीब आहे की शेतकरी त्याची किंमत कधीच मागत नाहीत, अन्यथा उसाला प्रति टन रू. दहा हजारांचा दर द्यावा लागेल, असे उद्गार प्रख्यात कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी काढले.
डॉ. मुळीक हे महाराष्ट्र शासनाच्या कृषिरत्न, कृषिभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित असून, शेती आणि शेतकऱ्यांसाठी तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘भूमाता’ संस्थेचे संस्थापक आहेत.
‘शुगरटुडे’ मॅगेझीनशी बोलताना डॉ. मुळीक यांनी उसाच्या बहुपयोगी गुणधर्माबद्दल, विशेषत: पर्यावरण संतुलना करिता असलेल्या उपयोगांबाबत माहिती दिली. तसेच साखर कारखानदारी प्रदूषणमुक्त करण्यासाठी उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने उभारलेल्या आरपीसी अर्थात रोटरी पार्टिकल कलेक्टर या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज संयंत्राची माहिती दिली.
अन्य साखर कारखान्यांनीदेखील उदगिरी शुगरचे अनुकरण करावे, असे आवाहन करताना सरकारने त्यासाठी मदत करावी, अशी मागणी डॉ. मुळीक यांनी केली.
डॉ. बुधाजीराव मुळीक यांचे सविस्तर प्रतिपादन ऐका खालील यूट्यूब लिंकवर