जागतिक रंगभूमी दिन

गुरुवार, मार्च २७, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र ६, शके १९४७
सूर्योदय०६:३७ सूर्यास्त१८:५१
चंद्रोदय०५:३९, मार्च २८ चंद्रास्त१६:५१
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : त्रयोदशी – २३:०३ पर्यंत
नक्षत्र : शतभिषज – ००:३४, मार्च २८ पर्यंत
योग : साध्य – ०९:२५ पर्यंत
क्षय योग : शुभ – ०५:५७, मार्च २८ पर्यंत
करण : गर – १२:२७ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २३:०३ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : कुंभ
राहुकाल : १४:१६ ते १५:४७
गुलिक काल : ०९:४० ते ११:१२
यमगण्ड : ०६:३७ ते ०८:०८
अभिजितमुहूर्त : १२:१९ ते १३:०८
दुर्मुहूर्त : १०:४१ ते ११:३०
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२४
अमृत काल : १७:५६ ते १९:२५
वर्ज्य : ०९:०७ ते १०:३५
वर्ज्य : ०६:१९, मार्च २८ ते ०७:४५, मार्च २८
२७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.
वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके,तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली.
मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे व प्रबोधनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली. १८४३ मध्ये सांगली येथे – विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली.
आज जागतिक रंगभूमी दिन आहे.
सर सय्यद अहमद खान – हे १९ व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या म्रूत्यूनंतर इ.स. १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला.
सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा बुरखा पध्द्तीला सक्त विरोध होता. त्यांनी सुफी पीर व फकिरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला. आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७० मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरूवात केली. इ.स. १८७७ मध्ये त्यांची इंपिरियल विधीमंडळात निवड करण्यात आली आणि इ.स. १८८८ मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.
• १८९८: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७)
गायक भार्गवराम आचरेकर – भार्गवरामांचा १९२५ च्या आसपास ललितकलादर्शमध्ये प्रवेश झाला. या कंपनीत त्यांचे संगीत व अभिनयाचे शिक्षण सुरू झाले. सुरुवातीला ते छोट्या-मोठ्या स्त्री-भूमिका व इतर कामेही करत. ललितकलादर्शच्या अनेक नाटकांतून त्यांनी कामे केली.
मामा वरेरकरांच्या ‘सोन्याचा कळस’ या नाटकातील ‘बिजली’ ही भूमिका अभिनय आणि गायन या दोन्ही दृष्टींनी गाजली. मा. भार्गवराम म्हणून त्यांचे नाव झाले. या नाटकाचे संगीत गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांचे होते. त्यामुळे भार्गवरामांचे पुढील संगीत शिक्षण रामकृष्णबुवा वझेंकडे सुरू झाले. याबरोबरच वझेबुवांचे चिरंजीव शिवरामबुवा वझे, मुहंमद बशीर खाँ साहेब, कागलकरबुवा, रामकृष्णबुवा बापट इत्यादी बुजुर्गांकडूनही भार्गवरामांनी संगीतविद्या मिळवली. बैठकीचे शास्त्रोक्त गाणेही पक्के होत गेले. याशिवाय पेंढारकरांनी संस्कृत श्लोक वगैरेचे पठण करून घेतल्यामुळे त्यांची वाणी शुद्ध, स्वच्छ व अस्खलित झाली. हा गुण त्यांच्या गायनातून प्रकर्षाने जाणवतो.