जागतिक नागरी संरक्षण दिन

आज शनिवार, मार्च १, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन १० , शके १९४६
सूर्योदय : ०६:५८ सूर्यास्त : १८:४४
चंद्रोदय : ०७:४८ चंद्रास्त : २०:१२
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – ००:०९, मार्च ०२ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा – ११:२२ पर्यंत
योग : साध्य – १६:२५ पर्यंत
करण : बालव – १३:४३ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ००:०९, मार्च ०२ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : मीन
राहुकाल : ०९:५४ ते ११:२३
गुलिक काल : ०६:५८ ते ०८:२६
यमगण्ड :१४:१९ ते १५:४७
अभिजित मुहूर्त : १२:२७ ते १३:१४
दुर्मुहूर्त : ०६:५८ ते ०७:४५
दुर्मुहूर्त : ०७:४५ ते ०८:३२
अमृत काल : ०४:४०, मार्च ०२ ते ०६:०६, मार्च ०२
वर्ज्य : २०:०१ ते २१:२७
आज जागतिक नागरी संरक्षण दिन आहे.
केवलानंदसरस्वती : – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित. पूर्वाश्रमीचे संपूर्ण नाव नारायण सदाशिव मराठे. जन्म कुलाबा जिल्ह्यतील सुडकोली गावी. ऋग्वेद, संस्कृत काव्यवाङ्मय आणि व्याकरण, न्याय, वेदान्त, मीमांसा इत्यादींत पारंगत. शिक्षण प्राचीन पद्धतीने गुरुगृही झाले. नव्य-न्यायाचे व शांकर अद्वैत वेदान्ताचे अध्ययन, १८९५ मध्ये वाई येथे आल्यावर झाले. अध्यात्मविद्येचे अध्ययन प्रज्ञानंदसरस्वती यांच्यापाशी झाले. वाई येथे स्वतःची पाठशाळा १९०१ पासून सुरू केली. त्याच पाठशाळेचे ‘प्राज्ञपाठशाळा’ असे नामकरण १९१६ साली केले.
दिनकरशास्त्री कानडे, महादेवशास्त्री दिवेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी इ. त्यांचे नामवंत शिष्य. १९२० साली प्राज्ञपाठशाळेस राष्ट्रीय शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. त्यातून अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार झाले. १९२५ साली धर्मकोशाच्या कार्यास प्रारंभ केला. संस्कृतमध्ये मीमांसाकोश (७ खंड, १९५२–६६) संपादन केला. हिंदुधर्मसुधारणेची चळवळ चालू ठेवण्याकरिता १९३४ साली म. म. डॉ. ⇨पां. वा. काणे , रघुनाथ शास्त्री कोकजे, केशव लक्ष्मण दप्तरी, ना. गो. चापेकर, ज.र. घारपुरे, म. म. श्रीधरशास्त्री पाठक इ. विद्वानांच्या साहाय्याने, धर्मनिर्णयमंडळ स्थापिले (१९३४). ब्रह्मचर्यातूनच १९३१ साली त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्यावर बद्रीनाथची पायी यात्रा केली.
करारी स्वभाव, उज्ज्वल चारित्र्य, अध्यात्मनिष्ठा व त्यागी जीवन हे त्यांचे व्यक्तिमत्त्वविशेष होत. वाई येथे ते निधन पावले. त्यांचे तेथे स्मारकमंदिर उभारले असून तेथे धर्मकोशाचे संपादनकार्य चालते. १९७५ पर्यंत त्याचे अकरा भाग प्रकाशित झाले. मीमांसाकोश व धर्मकोश ह्या ग्रंथांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली.
• १९५५: महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती याचं निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८७७)
उद्योगपती राम प्रसाद गोएंका – ‘टेक-ओव्हर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि विजेपासून ते संगीतापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या उद्योगाचे साम्राज्य पोहोचवले.
कोलकात्यातील सर्वात जुन्या उद्यमशील परिवारातील केशव प्रसाद गोएंका यांचे राम प्रसाद हे ज्येष्ठ पुत्र. गोएंका यांनी १९७९ मध्ये १०० कोटी उलाढालीच्या आरपीजी एंटरप्रायझेसची स्थापना केली.
या उद्योगसमूहामध्ये सुरुवातीच्या फिलिप्स कार्बन ब्लॅक, एशियन केबल्स, आगरपारा ज्यूट मिल, मर्फी इंडिया आदी कंपन्यांसह सिएट टायर्स, संगीत क्षेत्रातील सारेगामा आदी कंपन्यांचा समावेश आहे. ७० आणि ८० दशकात अस्थिर आर्थिक परिस्थितीतही पश्चिम बंगाल न सोडता, बंगाल सोडून जाणारे उद्योग ताब्यात घेत त्यांनी टायर, फार्मा, आयटी, वीजनिर्मिती आदी क्षेत्रांमध्ये आपल्या उद्योगाचे जाळे विस्तारले.
१९३०: उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल , २०१३)
- घटना :
१८७३: ई. रेमिंगटोन आणि सन्स कंपनी ने पहिल्या व्यावहारिक टंकलेखन यंत्र (टाईपरायटर) चे उत्पादन सुरू होते.
१८९३: अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रात्यक्षिक दाखवले.
१९०७: टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.
१९२७: रत्नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेऊन चर्चा केली.
१९३६: अमेरिकेतील महाकाय हूव्हर धरण बांधून पूर्ण झाले.
१९४७: आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.
१९५४: प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता.
१९९२: बोस्निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.
१९९८: एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.
२००२: पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.
• मृत्यू :
• १९८९: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील याचं निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर , १९१७)
• १९९४: निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई याचं निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी, १९३७)
• १९९९: वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर याचं निधन. (जन्म: २ मार्च १९१०)
• २००३: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी, १९४२)
- जन्म :
१९२२: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे जन्म. (मृत्यू: ८ जुलै, २००८)
१९४४: पश्चिम बंगाल चे ७वे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.