ध्यास एकरी शंभर टन ऊसाचा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रविवारची कविता

धसकटं, खोडं काढली सारी वेचून,
टाकले शेणखत शेतात विखरून।
झालं शेत नांगरून, दुबार वखरून,
अन झाली सहा फुटांवर सरी पाडून।।

आणली एक डोळा रोपं 86032ची,
केली तयारी ऊसाच्या लागणीची।
आंबोण देऊन रोपली एक डोळा रोपे,
ड्रीपचे पाईप वापरून काम झाले सोपे।।

केली नोंद कारखान्यावर शेतकीला,
बेवडं पेरले ताग धेंचा नत्र पुरवायला।
चार महिन्यांत केली बाळबांधणी,
आठ महिन्यांनी केली कटभरणी।।

दिले ऊस संजीवनी आणि जीवामृत,
पाचट काढून पसरवले ऊसात।।
चौदा महिन्यात आली पाणीबंद नोटीस,
झाली ऊसतोड देऊन पैशांची घुस।।

ऊसाचे वजन आले एकरी शंभर टन,
झाले मेहनतीचे चीज,भरून पावलं मन।।

रचनाकार:
आहेर वा. र. (नाशिक) .
9958782982

W R Aher Birthday
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »