मेहेर बाबा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सुप्रभात

आज मंगळवार, जानेवारी ३१, २०२३

रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४

भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर माघ ११, शके १९४४
सूर्योदय : ०७:१३ सूर्यास्त : १८:३१
चंद्रोदय : १४:०१ चंद्रास्त : ०३:४५, फेब्रुवारी ०१
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : दशमी – ११:५३ पर्यंत
नक्षत्र : रोहिणी – ००:३९, फेब्रुवारी ०१ पर्यंत
योग : ब्रह्म – १०:५९ पर्यंत
करण : गर – ११:५३ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ००:५५, फेब्रुवारी ०१ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : वृषभ
राहुकाल : १५:४१ ते १७:०६
गुलिक काल : १२:५२ ते १४:१७
यमगण्ड : १०:०३ ते ११:२७
अभिजित मुहूर्त : १२:२९ ते १३:१५
दुर्मुहूर्त : ०९:२९ ते १०:१४
दुर्मुहूर्त : २३:३६ ते ००:२६, फेब्रुवारी ०१
अमृत काल : २१:०८ ते २२:५४
वर्ज्य : १५:५१ ते १७:३७
वर्ज्य : ०६:५४, फेब्रुवारी ०१ ते ०८:४०, फेब्रुवारी ०१

।। पूर्वेच्या देवा, तुझे सूर्यदेव नाव
प्रभातीच येशी सारा जागवीत गाव ।।

।। विधाता जगाचा तूची उधळीत आशा

उजळिशी येता येता सभोवती जग, दिशा
रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव ।।

।। अंधारास प्रभा तुझी मिळे प्रभाकर
दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर
सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव ।।

।। पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस
तूच चालुनिया येशी माझिया घरास
भक्ताठायी गुंतलासे तुझा भक्तिभाव ।।

१९३१: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर,२००८)

मेहेर बाबा (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी)

हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते. इ. स. १९५४ मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती. बालपणात त्यांच्यामध्ये अध्यात्माचा ओढा असण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत.

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हजरत बाबाजान या मुस्लिम साध्वीशी त्यांचा परिचय झाला आणि सात वर्षे चाललेली आध्यात्मिक रुपांतरणाची प्रक्रिया सुरू झाली. पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी चार आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला.

उपासनी महाराज यांच्या समवेत ते सात वर्षे राहिले. नंतर त्यांनी सार्वजनिक कार्य सुरू केले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ ‘दयाळू पिता’ असा होतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले.

१० जुलै १९२५ पासून आयुष्याच्या अंतापर्यंत मेहेर बाबा शांत राहिले. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत. मंडळींसमवेत (शिष्यवर्तुळ) त्यांनी एकांतात बराच काळ व्यतीत केला. भरपूर प्रवास करीत त्यांनी सार्वजनिक मेळे भरविले; महारोगी, गरीब, मानसिक रुग्णांसाठी अनेक धर्मार्थ कार्ये त्यांनी केली.

• १९६९: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ – पुणे, महाराष्ट्र)

घटना :
१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
१९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.
१९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
१९५०: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.
१९५०: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.

मृत्यू:
• १९८६: संगीतकार विश्वनाथ मोरे यांचे निधन. (जन्म :१५ जुलै, १९३७ )
• १९९४: मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचे निधन. (जन्म :२५ सप्टेंबर,१९१४)
• २०००: नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन. (जन्म: २० मार्च , १९२२)
• २०००: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९०८ – डेहराडून, उत्तराखंड)
• २००४: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)
• २००४: गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचे निधन. (जन्म: १५ जून १९२९)

जन्म :
१८९६: ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविलेले कन्नड कवी पद्मश्री , दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर, १९८१)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »