‘संत तुकाराम’ निवडणुकीत विदुराजी नवले यांचे निर्विवाद वर्चस्व

पुणे : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संस्थापक विदुराजी (नानासाहेब) नवले यांच्या नेतृत्वाखालील श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलनं तिन्ही जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्वत: नवले, दत्तात्रय जाधव आणि चेतन भुजबळ हे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. पॅनलच्या १८ जागा बिनविरोध आल्या, मात्र तीन जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली.
मिळालेली मते – नानासाहेब नवले : ८५२४ मते, दत्तात्रय जाधव : ८३८० मते, चेतन भुजबळ : ७१८९ मते, अपक्ष बाळू भिंताडे : २५०५ मते
एकूण वैध मतपत्रिकांची संख्या : ९५१५. वैध मतांची संख्या : ११२
या निवडणुकीत श्री. संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलने प्रचंड मतांनी विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. नूतन संचालक मंडळासमोर कारखान्याचा सर्वांगीण विकास, ऊस उत्पादकांच्या समस्या सोडवणे व पारदर्शक कारभार ही महत्त्वाची उद्दिष्टे असणार आहेत.
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील २१ जागांपैकी गट क्रमांक एक ताथवडे-हिंजवडी गटातील तीन जागांकरिता झालेल्या झालेल्या मतदानासाठी मतदारांनी निरुत्साह दाखविला. मुळशी, मावळ, खेड, हवेली आणि शिरुर या पाच तालुक्यातील २२,२५८ मतदारांपैकी फक्त ९५४६ (४२.८९ टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला. सर्वात कमी मतदान लोणावळा येथील ४५८ पैकी ८५ (१४.१९ टक्के) मतदारांनी मतदान केलं. तर सर्वात जास्त इंदोरी येथील मतदान केंद्रावरील ३३८ पैकी ३०० (८८.७६ टक्के) मतदान केलं.
मतमोजणी आज रोजी द्रौपदा लॉन्स कार्यालय हिंजवडी डांगे चौक रोड येथे रविवारी सकाळी ९ वाजता झाली. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी १८ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरित तीन जागेसाठी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब भिंताडे, चेतन भुजबळ असे चार उमेदवार रिंगणात होते. मावळ तालुक्यातील मतदान केंद्रनिहाय एकूण मतदान आणि कंसात झालेलं मतदान १) तळेगाव दाभाडे – ७५४ (२०२), २) कार्ला – ११७ (२९). ३)सोमाटणे – ३८४ (१४२), ४) चांदखेड – ४३२ (२१९), ५) वडगाव मावळ – ३०८ (१४०), ६) इंदोरी – ६७७ (४८३), ७) उर्से – ५७३ (१९१), ८) काले कॉलनी- १००९ (५२४), ९) लोणावळा – ४५८ (६५), १०) दारुंब्रे – ६२८ (३७२), ११) कामशेत -६२२ (२१३).