विलास कारखान्याची निवडणूक बिनविरोध

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर ः विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत सर्वच २१ संचालक बिनविरोध निवडणूक आले आहेत. प्रशासनाकडून या विजयाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.  या निवडणुकीत आ.अमित देशमुख दोन गटांतून आक्षेपानंतरही निर्विरोध आले आहेत.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच दि. १३ मार्चअखेर आ. अमित देशमुख, कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्यासह २३ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले होते. या अर्जाची छाननी सोमवारी झाली. भिसेवाघोलीच्या सरपंच स्वयंम वायाळ यांनी महिला गटातून दोन व शिराळा गटातून एक असे तीन, तर उपसरपंच संभाजी वायाळ यांनी शिराळा गट व ईतर मागासवर्गीय गटातून प्रत्येकी एक असे दोघांचे एकूण दाखल केलेले पाच अर्ज बाद झाले. तर नरिसंग बुलबुले आणि नितीन पाटील यांचेही दाखल दोनपैकी एक अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नन्हे यांनी बाद ठरवले.

छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी प्रसिध्द केलेल्या वैध उमेदवारांच्या यादीनुसार महिला गटातून विद्यमान चेअरमन वैशालीताई देशमुख व लता देशमुख, निवळी गटातून विद्यमान व्हा. चेअरमन रवींद्र काळे, नरसिंग बुलबुले व रसूल पटेल, शिराळा गटातून तात्यासाहेब पालकर, रणजित पाटील व गोवर्धन मोरे, कासारजवळा गटातून माजी आ. वैजनाथ शिंदे, अनंत बारबोले व हणमंत पवार, चिंचोलीराववाडी गटातून नेजाती साळुंके, नितीन पाटील व रामराव साळुंके, बाभळगाव गटातून आ. अमित देशमुख, अमृत जाधव व सतीश शिंदे, उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गटातून आ. अमित देशमुख, अनुसूचित जाती गटातून दीपक बनसोडे, इतर मागासगर्वीय गटातून श्याम बरुरे तर भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास गटातून सुभाष माने यांचे २१ जागांसाठी २१ अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयाची प्रशासनाकडून औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

दरम्यान, आ. अमित देशमुख यांनी दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्या अर्जावर छाननीदरम्यान संभाजी वायाळ यानी आक्षेप घेतले होते. परंतु, निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नन्हे यांनी आक्षेप फेटाळून लावल्याने आ. देशमुख दोन गटातून संचालक म्हणून निर्विरोध विजयी झाले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »