अमित देशमुख : वाढदिवस शुभेच्छा

महाराष्ट्राचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर (शहर) चे आमदार आणि साखर उद्योगात भरीव योगदान देणारे व्यक्तिमत्त्व अमित विलासराव देशमुख यांचा २१ मार्च रोजी वाढदिवस. या निमित्त त्यांना ‘शुगरटुडे’कडून खूप खूप शुभेच्छा!
यानिमित्ताने लातूर शहरासह जिल्हाभरात विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर करण्यात आला.
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध पदाधिका-यांनी लातूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात जाऊन ‘श्री’ चा अभिषेक करून आरती केली. त्यानंतर सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान हजरत सुरत शहावली दर्गा येथे चादर अर्पण करून गंजगोलाई येथील आई जगदंबेच्या मंदिरात जाऊन जगदंबा मातेची आरती केली. तसेच लातूर शहरातील मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान केले.