सध्या चांगले साखर कारखाने शोधावे लागत आहेत – साखर आयुक्त

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर : प्रतिनिधी

राज्यात अनेक साखर कारखाने आहेत; पण सध्या चांगले साखर कारखाने शोधावे लागत आहेत, अशी खंत व्यक्त करून, चांगले चालणारे आणि शेतक-यांच्या हिताचे काम करणारे साखर कारखाने म्हणून लातूर जिल्ह्यातील साखर कारखानाकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.

शेखर गायकवाड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गायकवाड यांच्या हस्ते व माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. ८ मे रोजी दुपारी उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या युनिट-२ च्या गळीत हंगाम सन २०२२-२३ मधील साखर पोत्याचे पूजन करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते.

गायकवाड म्हणाले की, अनेक साखर कारखाने आहेत पण सध्या चांगले साखर कारखाने शोधावे लागत आहेत. चांगले चालणारे आणि शेतक-यांच्या हिताचे काम करणारे साखर कारखाने म्हणून लातूर जिल्ह्यातील साखर कारखानाकडे पाहिले जाते .

ते पूढे बोलतांना म्हणाले, महाराष्ट्रातील साखर उदयोगात १ लाख कोटी रुपयाची उलाढाल झाली आहे. या कारखानदारीतून सामान्य शेतक-यांने महाराष्ट्राचे चित्र बदलले, साखर उदयोगातील सर्वांच्या परीश्रमाने राज्याचा साखर उत्पादनात प्रथम क्रमांक आला आहे. आज भारत पहिल्या क्रमांकावर तर ब्राझील तिस-या क्रमांकावर आला आहे. देशातील साखर उदयोगाच्या वाटचालीत महाराष्ट्र राज्याचे मोठे योगदान आहे. साखर कारखानदारी चांगली चालली पाहिजे आणि शेतक-याला चांगला भावही दिला पाहिजे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आता साखर कारखाने इंधनाचे कारखाने होणार आहेत, आपण क्रूड ऑइल विदेशातून मागवतो पण ते आता येथे उसापासून तयार करीत आहोत. ऊसापासून इथेनॉलनिर्मीतीमूळे महाराष्ट्राची ब्राझीलकडे वाटचाल सुरु झाली आहे. साखर उद्योग आता एक नंबरला आला आहे. महाराष्ट्राची आर्थिक प्रगती आणि जीडीपी वाढवण्यात साखर उद्योगाने मोठी मदत केली आहे, असे त्यांनी सांगीतले.

विलासराव देशमुख यांनी सहकार व राजकारणाची वेगळी संस्कृती रुजवली

लोकनेते विलासराव देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामिण भागाच्या विकासासाठी सन १९८० च्या दशकात सहकारी साखर कारखानाची उभारणी केली. त्यांच्या या दुरदृष्टी विचारामुळे, आणि नेतृत्वामुळे अनेक साखर कारखाने चांगल्या पध्दतीने कार्यरत आहेत. यासाठी त्यांनी या क्षेत्रात चांगले काम करुन सहकार चळवळ व राजकारणाची वेगळी संस्कृती या भागात रुजवली आहे, असे अमित देशमुख म्हणाले..

यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, प्रादेशिक सहसंचालक नांदेडचे रावळ, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे,

रेणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, रामराव बिराजदार, मनमतआप्पा किडे, प्रीति भोसले, विलास सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. आर. पवार, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, सूर्यकांत सुडे, भैरवनाथ सवासे, अमर मोरे, संजय पाटील खंडापूरकर, दगडूसाहेब पडीले, अनिल पाटील, सुभाष माने, रंजीत पाटील, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, गोविंद डुरे आदीसह कारखान्याचे खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी उस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

अमित देशमुख म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी सहकार, साखर उद्योग आणि शेतक-यांचा विकास करण्यासाठी जो विचार मांडला त्यावर साखर आयुक्त गायकवाड यांनी चांगले काम करुन शिक्कामोर्तब केले आहे. आज ऊसापासून साखरनिर्मिती जगात केली जाते. या साखर उत्पादनात तिस-या क्रमांकावर महाराष्ट्र पोहोचला आहे, राज्यातील बहाद्दर शेतक-यांची यामागे किमया आहे.

महाराष्ट्र आता विदेशी देशांशी साखर उत्पादनात स्पर्धा करतो आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांनी सन १९८० च्या दशकात येथे शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामिण भागाच्या विकासासाठी कारखाना सुरु केला. त्यांच्या विचारामुळे, आशीर्वादाने नेतृत्वामुळे हे सर्व साखर कारखाने चांगल्या पध्दतीने चालत आहेत. यासाठी त्यांनी चांगले काम करुन सहकार चळवळ व राजकारणाची वेगळी संस्कृती आपल्या कार्यातून या भागात रुजवली आहे, असे देशमुख म्हणाले.

याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, आज सहकार चळवळीचे नेतृत्व मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख करीत आहेत, लातूर जिल्ह्याचे नाव सहकार आणि साखर उद्योगात राज्यात घेतले जाते. गेल्या वर्षी मराठवाडा विदर्भामध्ये एफआरपीमध्ये या कारखान्याने विक्रम केला तो विक्रत याही वर्षी कारखान्याने केला आहे.

साखर उद्योगात जगात महाराष्ट्राचे स्थान अधिक भक्कम करण्यासाठी आपण प्रयत्नरत राहू, आपला साखर उत्पादनानातील दबदबा कायम टिकवण्यासाठी अभिनव योजना राबवाव्या लागतील असेही त्यांनी सांगितले. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आयुक्त म्हणून केलेलया कामाचे कौतूक करुन त्यांनी आयुक्त म्हणून अतिशय चांगले काम केले आहे, राज्य व देशाला त्यांच्या या ज्ञानाचा, अनुभवाचा सदपयोग होईल असे त्यांनी सांगितले.

विलास सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी प्रास्ताविक करुन नवीन आसवनी प्रकल्पाच्या कामाची व कारखान्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय गूडसूरकर यांनी केले, तर शेवटी आभार संचालक युवराज जाधव यांनी मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »