‘स्वामी समर्थ’ चेअरमनपदी संजीव पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : अक्कलकोटमधील दहीटणेच्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी संजीव सिद्रामप्पा पाटील यांची, तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ भरमशेट्टी यांची बिनविरोध नियु्क्ति करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण गायकवाड यांनी काम पाहिले. तर सहाय्यक म्हणून विद्याधर माने यांनी काम पाहिले.
दि. ८ रोजी निवडीसाठी सर्वसाधरण सभा बोलवण्यात आली होती. चेअरमन व व्हाईस चेअरमन दोन्ही पदासाठी एकच उमेदवार अर्ज दाखल झाल्यामुळे दोन्ही पदाची बिनविरोध निवड करण्यात आली.

सर्वांनी टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवू, कारखान्याची विकासाकडे वाटचाल करण्यासाठी सर्व संचालकांना एकत्रित घेऊन काम करू, अशी ग्वाही संजीव पाटील यांनी निवडीनंतर दिली.

या वेळी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व माजी आमदार संचालक सिद्रामप्पा पाटील, बसलिंगप्पा खेडगी, दिलीप पाटील, आप्पासाहेब पाटील, आदर्श पाटील, आनंद पाटील, आकाश पाटील उत्तम वाघमोडे, श्रीमंत कुंटोजी, भीमाशंकर धोत्री, संजीवकुमार अ. पाटील, महेश पाटील, दिलीप शावरी, गिरीजा विजापुरे, देवेंद्र बिराजदार, अभिजित सवळी, शिवप्पा बसरगी, महानंदा निंबाळ, मल्लिकार्जुन बिराजदार, भरमनाथ भुताळी, कार्यकारी संचालक अशोक मुलगे आदी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »