नामवंत सल्लागार आहेर यांचे समर्थ कारखान्यावर व्याख्यान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

”शुन्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी

जालना : साखर उद्योगतील नामवंत सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र.आहेर यांचे “एकच ध्यास, एकच ध्यास” “शुन्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी”या विषयावरील व्याख्यान समर्थ सहकारी साखर कारखाना लि. युनिट १-२ (जिल्हा-जालना) येथे नुकतेच दोन दिवस झाले.

साखर कारखान्याचे मार्गदर्शक, माजी मंत्री, आमदार श्री.राजेश टोपे यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली, व्यवस्थापकीय संचालक श्री. बाजीराव पावसे आणि कार्यकारी संचालक श्री.दिलीप पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, दोन्ही कारखान्यावर अधिकारी आणि कारखाना कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठीआणि टेक्निकल स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत श्री.आहेर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

कारखान्याचे ‌व्यवस्थापकीय संचालक श्री. पावसे यांनी प्रास्ताविक करून श्री.आहेर यांचा परिचय करून दिला आणि नंतर त्यांचा सत्कार केला.

“एकच ध्यास, एकच ध्यास”, “शुन्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेचे महत्त्व विशद करताना, श्री आहेर यांनी हे विचारपुष्प कर्मयोगी स्व. अंकुशराव टोपे यांना अर्पण केले. नंतर श्री. ‌आहेर यांनी कारखाना सुरू असताना मिल बंद झाल्यावर कारखान्याचे करोडो रुपयांचे नुकसान कसे होते, हे आकडवारीनिशी आणि कारखाना स्टॉपेजेसच्या संदर्भासह व्यवस्थितपणे समजून सांगितले.

यावर उपाययोजना म्हणून “एकच ध्यास,एकच ध्यास” “शून्य टक्के मिल बंद तास या संकल्पनेची अंमलबजावणी”याविषयी शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली आणि किमान आठ-दहा टक्के स्टाॅपेजेस आपण सुयोग्य नियोजन करून अनलोडर ते शुगर ग्रेडर पर्यंतचे ऑफ सिझन मध्येच कसोशीने मेंटेनन्स करून वेळेचे, कामगारांचे, स्पेशल पार्टचे आणि व्यवस्थापनातर्फे आर्थिक नियोजन करून आपण साखर कारखान्यावर “शून्य टक्के मिल बंद तास या संकल्पनेची अंमलबजावणी करू शकतो आणि कारखान्याचे आर्थिक नुकसान टाळता येते. त्यामुळे मिलचे रिझल्ट सुधारतात. वेळेची बचत होऊन उत्पादनात वाढ होते, असे समजावून सांगितले.

कारखान्याने काही प्रमाणात गुंतवणूक करून इव्हपरेटरसारखे युनिट स्टॅण्डबाय ठेवून उर्वरित मिल बंद तास कमी होऊ शकतील असे सुचवले.

दुपारच्या सत्रात हाय प्रेशर बॉयलरची चालू असताना घ्यावयाची काळजी आणि ऑफ सिझन मध्ये करावयाचे मेंटेनन्स तसेच बॉयलरचे शासकीय नियमांचे पालन शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी काही टिप्स दिल्या.

शेवटी प्रश्नोत्तराच्या तासात श्री.आहेर यांनी सर्वांचे शंका-समाधान केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले.

या साखर कारखान्याचे वर्क्स मॅनेजर श्री‌. जे. जी. ढुमणे, राठोड आणि त्यांचे सहकारी सर्व इंजिनिअर आणि चिफ केमिस्ट नंदकुमार पवार, श्री‌. माने , सुर्यवंशी सर्व केमिस्ट आणि सर्व कामगार बांधव आवर्जून उपस्थित होते. कार्यकारी संचालक दिलीप पाटील यांनी आभार मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

One comment

  1. The sugar processing and engineering technology developed like any thing from steam consumption to Tola losses reduction . We are paying to Farmer Rs 3.50 per kg where as we are paying RS 10 to 15 per kg of vegitables short term Crop . How Cane Former survive ? Think we’ll and act accordingly .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »