वाटणी विचारांची

आम्ही वारस जमीनीचे
सर्व अवकाश तुमचे
फक्त संविधान आमचे
गीता कुराणही तुमचे||१||
हो आम्ही भाकरीचे धनी
तुम्ही व्हा अध्यात्माचे ज्ञानी
आम्हा रोजगाराची वर्णी
तुम्ही कर्मकांडाचे धनी||२||
सोडला नाही सुविचार
तुम्ही मांडा काळा बाजार
आम्हाला पाहिजे लेखणी
तुम्ही शिका तीर कमानी||३||
आम्हाला पाहिजे सन्मान
ठेवा तुम्ही दुराभिमान
आम्हाला पाहिजे इन्सान
ठेवा तुम्ही जातीचे ज्ञान ||४||
आम्हाला स्वातंत्र्य दाखवा
धर्माचे गुण तुम्ही गावा
आमची डोळस ही श्रद्धा
तुम्ही बाळगा अंधश्रद्धा||५||

कवी: रघुनंदन, नाशिक