कामगारांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे
१) मागील वर्षाचे मार्कमेमो
२) चालू वर्षाचे बोनाफाईड
३) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
४) पालकाचे आधार कार्ड
५) पालकाची जून २२ ची पगार स्लिप
६) बँक पासबुक.
७) स्वयंघोषणापत्र
अर्ज ऑनलाईन
www.public mlwb in
या वेबसाईटवर भरण्याची
📚
महाराष्ट्र शासन-कामगार विभाग
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना
सर्वसाधारण
🌼 कोणासाठी आहे❓
माहे जुन व डिसेंबरच्या पगारातून ₹१२/- इतका कामगार कल्याण निधी कपात होणा -या कामगारांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना.
म्हणजे कोणासाठी?
साखर कारखाने, खाजगी कंपनी, सुतगिरणी, लहाण मोठे कारखाने, सर्व बँका, इन्शुरन्सची कंपनी, शाॅपिंग माॅल्स, वाहतूक कंपन्या, एस.टी. महामंडळ, वीज कंपनी, वीज वितरण कंपनी, बी.एस.एन.एल., एम.टी.एन.एल. दुध संघ, कापूस पणन महासंघ, गव्हर्नमेंट प्रेस, सर्व दवाखाने, कृषि उद्योग महामंडळ, सर्व वृत्तपत्रे, कुरिअर सर्विसेस, प्राथमिक शिक्षक बँक, किंवा
फॅक्ट्रि अँक्ट अंतर्गत येणार्या सर्व आस्थापना, बाँम्बे शाॅप अँक्ट अंतर्गत सर्व दुकाने, द मोटर ट्रान्सपोर्ट अँक्ट अंतर्गत नोंदित आस्थापना मध्ये काम करणार्या कामगार व कर्मचार्यांसाठी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हि योजना दरवर्षी चालवते.
🌸 नियम अटी
📗 फक्त कामगारांच्या पाल्यांसाठी (मुले व पत्नी) योजना आहे.
📙 अर्ज करण्यास मागील वर्षिच्या परीक्षेत कमित कमी ६०% आवश्यक आहेत.
📘 ९ पास अर्थात १० वी पास पासुन ते पुढील सर्व शिक्षणाकरिता अर्ज करता येईल. * *प्रत्येक वर्षी अर्ज करता येतो.
📕फक्त शासनामान्य अभ्यासक्रम व शासनमान्य संस्थेच्या प्रवेश घेतलेल्यांनीच अर्ज करावा.
📗 मुक्त विद्यापीठ, बहिस्थ अभ्यासक्रम, दूरस्थ शिक्षण, अप्रेंटिशिप, स्टायपंड घेणारांनी अर्ज करु नये. अर्ज बाद करण्यात येईल. ‼️
📘 अर्ज भरताना सर्व ओरिजनल, 👈🏼 मुळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत, झेराॅक्स कागदपत्रे अपलोड केल्यास *अर्ज बाद केला जाईल. ❌
📙अर्ज भरताना एकुण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी तपशिल टाकायलाच हवा. ज्यांना ग्रेड, ग्रेड पाॅइंट किंवा इतर प्रकारे गुण दिले असतील तर त्यांनी काॅलेजकडुन गुणांची टक्केवारी व गुण आणि स्वताच्या नावाच्या तपशिलासह पत्र प्राप्त करुन ते पत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. important
📘दिव्यांगांना ६०% गुणांची अट असणार नाही. तो विद्यार्थी फक्त उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.
📗 सदर शिष्यवृत्ती मंडळाची तरतुद व मेरिट या निकषावर दिली जाणार आहे.
📙 अपूर्ण माहितीचा आणि चुकीची माहितीचा अर्ज online भरलेस अर्ज बाद केला जाईल. याची जबाबदारी कामगार व त्याच्या पाल्याची आहे.
📕online विहित नमुण्यातिल अर्ज भरावा लागेल.
🌸
शिष्यवृत्ती रक्कम
🔅१० वी ते १२ वी.- ₹.२०००/-
🔅पदवी – ₹. २५००/-
🔅पदवीत्तोर पदवी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)- ₹.३०००/-
🔅 व्यावसायिक पदविका (डिप्लोमा) – ₹ २५००/-
🔅व्यावसायिक पदवी – ₹. ५०००/-
🔅पी. एच. डी. नोंदणी ₹.५०००/-
🔅 mpsc prelim उत्तीर्ण ₹. ५०००/-
🔅UPSC Preliminary उत्तीर्ण – ₹. ८०००/-
🔅 परदेशात शिकत असेल तर ₹. ५० हजार. (परदेश शिष्यवृत्तीचा स्वतंत्र online अर्ज भरावा.)
🌸 आवश्यक कागदपत्रे व पूर्वतयारी
🔸कामगाराचा फोटो
🔸कामगाराची जुन २२ पे स्लिप (त्यात रु. १२ कपात असायलाच हवी.)
🔸कामगाराचे आधार कार्ड दोन्ही बाजू. पत्यासह.
🔸कामगाराचा LIN number (जो कंपनीत मिळेल.) मागील वर्षिचा वापरून पहावा अन्यथा कंपनीतून किंवा खाली दिलेल्या फोनवर संपर्क करुन मिळवावा.
🔸कामगाराचा मोबाइल नंबर.(तो कंपनीत लेबर फंड भरताना नोंदविला आहे.)
🔸विद्यार्थ्याचा फोटो
🔸विद्यार्थ्याचे आधार कार्ड
🔸विद्यार्थ्याची मागील वर्षाची मार्कशिट कलर ओरिजनल काॅपि.
🔸सेमिस्टर पध्दत असेल तर मागील वर्षातील दोन सेमिस्टरचे २ निकालपत्रके. हे दोन्ही कागद एकाच ठिकाणी स्कॅन करावे किंवा दोघांची एकच पिडिएफ बनवावी.
🔸 निकालपत्रावर ग्रेड किंवा ग्रेड पाॅइंट असतील तर टक्केवारीत रूपांतर केलेले तपशिलासह काॅलेजचे पत्र. 👈🏼
🔸 शैक्षणिक खंड असेल तर तहसीलदार प्रमाणपत्र. Gap फक्त १ वर्षाचा असावा. सर्वसाधारण शिष्यवृत्ती साठी.
🔸मुलाचे चालु वर्षी प्रवेश घेतलेले बोनाफाइड (२२-२३ उल्लेख असलेले)
🔸कामगाराचा सन २१-२२चे उत्पन्न दाखविणारा फाॅर्म नंबर १६ किंवा कारखान्याने दिलेले वार्षिक उत्पन्न लिहिलेले सहि शिक्यासह पत्र/ दाखला.
(फाॅर्म १६ ला एकापेक्षा जास्त कागद असतात. ते सर्व कागद एकत्र म्हणजे एकाच फाइलमध्ये पिडिएफ करुन ती पिडिएफ अपलोड करावी लागेल.)
🔸 बँक पासबुक ओरिजनल क्लियर काॅपि. त्यावरील अकाउंट नंबर व आय एफ सी कोड स्पष्ट असावा.
🔸रेशन कार्ड
🔸कामगाराने व्हि.आर.एस. घेतली असेल तर त्याबाबतचे सर्टिफिकेट.
🔸अर्जदार मुलगा मुलगी /दिव्यांग असेल तर त्याचे सर्टिफिकेटे ओरिजनल प्रत.
🔸मागिल वर्षी online पध्दतीने लाभ घेतला आहे त्यांनी membership करिता त्यांचा membership code करिता केंद्रा शी संपर्क त्वरित करा.
📌(वरील सर्व कागदपत्रे “ओरिजनल कागदाची क्लियर स्कॅन काॅपी असावीत”. अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.)
📌 याव्यतिरिक्त स्वतःच्या मनाने कोणतेही इतर कागद लावु नयेत./ अपलोड करु नयेत. अर्ज बाद करण्यात येईल.
🌸
Online भरावयाची फी
▪️Member Rs. 15/- कामगार
▪️Family Rs. 20/- प्रत्येकी
(Online credit / debit card, ATM card, UPI/ फोन पे गुगल पे वरुन भरता येते.)
👉🏼 घरातील म्हणजे कुटुंबातील सर्व मेंबरची नावे कामगाराने त्याच्या Labour login मध्ये प्रोफाईलवर add update family member मध्ये टाकावीत. व membership फी भरावी म्हणजे भविष्यात अनेक योजनांचा लाभ त्या त्या व्यक्तीस घेता येणार आहे.
ज्यांची नावे मागील वर्षी add केली असतील त्यांनी डायरेक्ट यावर्षिची membership नोंदवावी.
👆🏼👆🏼👆🏼👆🏼
(सर्व कागदपत्रे ओरिजनलची स्कॅन काॅपि अपलोड करावी. झेराॅक्स अपलोड केल्यास अर्ज नामंजूर होईल.)
📕अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१/१०/२०२२
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
अर्ज online वर करावयाचा आहे.
त्या साठी सर्वप्रथम
कामगार कल्याण भवन बजाजनगर औरंगाबाद
ची मेंबरशिप घ्यावी
🌸
ONLINE PROCESS कशी करायची?
🔅आपल्या कंपनीतून कामगाराने स्वतःचा LIN number आणि नोंदविलेला mobile number मिळवावा. (लिन नंबर हा युजर आय डी व मोबाइल नंबर हा पासवर्ड आहे. मागील वर्षिचा लिन नंबर सुरुवातीस टाकून पहावा. नसेल तर कंपनीकडून नविन क्रमांक घ्यावा.)
🔅यात
District – औरंगाबाद
Division – औरंगाबाद
Circle – औरंगाबाद
Center – कामगार कल्याण भवन बजाजनगर निवडावे.
अशा नोंदी कराव्यात.
🔅पुढिल योजना मिळविण्यास आपले सर्व कुटुंबियांस member (सभासद) करावे.
🔅माहिती भरून स्वत: कामगार व त्या सर्वांचे online पैसे भरावेत.
🔅प्रत्येकाचे आधार कार्ड व कामगाराची जुन २१ ची पेस्लिप / अस्थापनाचा दाखला अपलोड करावे.
🔅membership केल्यानंतर कामगार कल्याण भवन बजाजनगर यांचेकडून त्याचे approval करुन घ्यावे. (फोन करावा)
🔅 Membership option मध्ये Application For Schemes याची निवड करुन “सर्वसाधारण शिष्यवृत्ती /General scholarship योजनेचा” अर्ज भरावा.
🔅त्यातील आवश्यक सर्व माहिती भरावी.
🔅कागदपत्रे पिडिएफ / जेपिजी फाइल्स अपलोड कराव्यात.
🔅अर्ज पुन्हा एकदा, दोनदा तपासून *submit करावा.
🔅 *विद्यार्थ्यांचा वर्ग लिहिताना सर्वसाधारण अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम यातील फरक समजून घ्यावा. कारण यानुसारच शिष्यवृत्ती रक्कम ठरणार आहे.*
🔅‼️चुकिचा अकाउंट नंबर व आय एफ सी कोड टाकल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल.🔴‼️❌ यासाठी चारवेळा तपासावे. Bank अकाउंट चालु आहे का याची अगोदर खात्री करूनच लिहावा. (बँकेचे व्यवहार ३-६ महिणे नसतील तर अकाउंट बंद केले जाते.)
📌तयार झालेल्या अर्जाची प्रिंट करुन घ्यावी.
🌀
संपर्क :
विजय अहिरे
कल्याण निरीक्षक
कामगार कल्याण भवन बजाजनगर
📲 9422214168
🌸
कृपया आपल्या पगारातून माहे जुन २०२२ मध्ये ₹१२/- (कामगार कल्याण निधी) कपात होत असेल तर फक्त त्यांनीच, फोनवर संपर्क करावा.
📌
कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त निधी भरणाऱ्या कामगारांपर्यंत पोचवावी
🙏🏼
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ