इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास एक लाख कोटी विदेशी चलनाची बचत

सूरत – मोदी सरकारने नोव्हेंबर, 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के एथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवले होते. ते भारताने पाच महिन्यांपूर्वीच गाठले आहे. 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ठ गाठल्यास देशाची अर्थव्यवस्था बदलेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी केले.
‘सरकारने 20 टक्के एथेनॉल मिश्रणाचे लक्ष गाठण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच 2025 पर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. तसेच, आगामी काळात इथेनॉलचे उत्पादन पेट्रोलियम क्षेत्राची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलेल.
20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास 2025 पर्यंत जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल. एथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना लगाम लावण्यासहही मदत मिळेल, असे सहकारमंत्री शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले, कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जैव इंधन एक चांगला पर्याय आहे. याचे उत्पादन 2011-12 मधील 17.2 कोटी टनावरून वर्ष 2021-22 मध्ये 21.2 कोटी टन झाले आहे. जगभरात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने हे साध्य करण्यासाठी सिस्टिमॅटिक आणि वैज्ञानिक इथेनॉल नीती तयार केली आहे’ , असेही शाह म्हणाले.
हाजिरा येथे कृभकोच्या इथेनॉल प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.
