पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा

पुणे : वादळी वाऱ्यासह (gusty winds) पूर्वमोसमी पावसाने गुरुवारी (ता. ७) कोल्हापूर, सातारा, (Satara) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांना तडाखा दिला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट ही झाली आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पावसाने(Rain) पपई, कलिंगड, कारले, दोडका, टोमॅटो,(Tomato) मिरची, फ्लॉवर, कोबी आदी पिकांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेल्या भाजीपाला पिकांचीही बुधवारी (ता. ६) वादळी पावसासह (Unseasonal rain) झालेल्या गारपिटीने (Hail) माती केली. कोकणात अवकाळी पाऊस, सतत ढगाळ वातावरण, वाढलेले तापमान अशा अनेक नैसर्गिक संकटाचा सामना जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना करावा लागत आहे. वादळी वाऱ्यासह सलग तीन दिवस झालेल्या पूर्वमोसमी पावसाने आंबा, काजू बागायतदारांचे (cashew growers) अक्षरशः कंबरडे मोडले आहे.
सिंधुदुर्गला पूर्वमोसमी पावसाने झोडपले
सातारा जिल्ह्यात मंगळवारी (ता. ५) पूर्वमोसमी पाऊस झाला. तर शुक्रवारी (ता. ८) खटाव सातारा, कोरेगाव तालुक्यांत गारांचा पाऊस(Rain) झाल्याने पिकांना फटका बसला आहे. तर नेरमध्ये वीज पडून दोन शेळ्या ठार झाल्या आहेत. सातारा तालुक्यात काशीळ परिसरात कऱ्हाड तालुक्यातील पेरले, इंदोली परिसरात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला.