महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून कर्ज परतफेड योजना जाहीर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यातील आजारी साखर कारखाने आणि सहकारी संस्थांना उभारी देण्यासह संबंधित संस्थांकडील थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘सामोपचार कर्ज परतफेड योजना’ जाहीर केली आहे. सध्या अशा कर्जदारांकडे गुंतलेली थकीत रक्कम १७५६ कोटी असून त्यापैकी जवळजवळ ६० टक्के रक्कम वसूल होण्याची शक्यता बँकेकडून व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व थकीत रकमेची बँकेने १०० टक्के तरतूद केली असल्याने वसूल होणारी सर्व रक्कम थेट नफ्याला जाणार आहे.

बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले, ‘३१ मार्च २०२२ अखेर अनुत्पादित वर्गवारीत समाविष्ट झालेल्या सर्व साखर कारखाने व सहकार कायद्यांतर्गत नोंदणीकृत सर्व सहकारी संस्थांकडील सर्व कर्ज खात्यांना ही योजना लागू होणार आहे. जामीनदार हे सहकर्जदार असल्याने या योजनेंतर्गत कर्जदाराबरोबरच जामीनदारांनाही स्वतंत्रपणे किंवा एकत्रित संस्थेच्या वतीने अर्ज करता येणार आहे. सरफेसी कायद्यांतर्गत नोटीस, वसुलीसाठी कायदेशीर कारवाई चालू असलेली, राज्य बँकेने ताब्यात घेतलेले तथापि अद्याप विक्री न झालेल्या व ॲवॉर्ड प्राप्त झालेल्या अनुत्पादित कर्ज वर्गवारीमधील संस्थांनाही योजना लागू राहणार आहे. ज्या संस्था यापूर्वी राज्य बँकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेत सहभागी झाल्या असतील आणि त्यांनी तडजोड रकमेचा भरणा केला नसल्यामुळे त्या संस्थांना बँकेने या योजनेतून अपात्र केले असेल, अशा संस्थांना देखील सामोपचार योजना लागू राहणार आहे.’

सणाऱ्या कर्जांना आरबीआयच्या परवानगीशिवाय ही सवलत देता येणार नाही. न्यायालयासमोर तडजोड झालेल्या कर्जप्रकरणांना ही योजना लागू होणार नाही, असेही अनास्कर यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »