शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ
आज शुक्रवार, मार्च १७, २०२३ रोजीचे
पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन २६, शके १९४४
सूर्योदय : ०६:४६ सूर्यास्त : १८:४८
चंद्रोदय : ०४:०८, मार्च १८ चंद्रास्त : १४:२०
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : दशमी – १४:०६ पर्यंत
नक्षत्र : उत्तराषाढा – ०२:४६, मार्च १८ पर्यंत
योग : वरीयान् – ०६:५९ पर्यंत
क्षय योग : परिघ – ०३:३३, मार्च १८ पर्यंत
करण : विष्टि – १४:०६ पर्यंत
द्वितीय करण : बव – ००:४२, मार्च १८ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : धनु – १०:१९ पर्यंत
राहुकाल : ११:१७ ते १२:४७
गुलिक काल : ०८:१६ ते ०९:४६
यमगण्ड : १५:४८ ते १७:१८
अभिजित मुहूर्त : १२:२३ ते १३:११
दुर्मुहूर्त : ०९:१० ते ०९:५८
दुर्मुहूर्त : १३:११ ते १३:५९
अमृत काल : २०:५४ ते २२:२२
वर्ज्य : १२:०७ ते १३:३५
वर्ज्य : ०६:२३, मार्च १८ ते ०७:५०, मार्च १८
अनुताई वाघ
सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांना वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य येऊन सुद्धा तत्कालिन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी बोर्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला.
तेथे १९४७ ते ९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले. पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणा-या या अनुताईंना आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, फाय फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांबरोबरच ‘पद्मश्री’ ने सन्मानित केले गेले. त्यांचे शिक्षणविषयक ग्रंथ इंग्रजी, हिंदी, गुजराथीतून अनुवादित झाले. प्रबोधनासाठी वाहिलेल्या ‘शिक्षणपत्रिका’ व स्त्रीजागृतीसाठी असलेल्या ‘सावित्री’ मासिकाच्या त्या संपादक होत्या.
१९१०: समाजसेविका पद्मश्री पुरस्कार सन्मानित अनुताई वाघ यांचा जन्मदिन (मृत्यू: २७ सप्टेंबर १९९२)
चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी- १९५५ मधे, वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते. मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसंच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोचवला.
मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमांमधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.
रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो. रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, मुलगा लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डाॅ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
२०२० : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी, आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे निधन. ( जन्म : १७ नोव्हेंबर, १९३८)
घटना :
१९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
१९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
१९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.
• मृत्यू :
• १८८२: आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे, १८५०)
• १९३७: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्हे यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी, १८७१)
• २०००: पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे यांचे निधन.
मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी होते. पर्रीकर इ.स. २००० ते इ.स. २००५ व इ.स. २०१२ ते इ.स. २०१४, तसेच १४ मार्च २०१७ ते १७ मार्च २०१९ या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर होते.
त्यांचा जन्म म्हापसा(गोवा) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटी ची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत
पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी पर्रीकरांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
२०१९ : माजी संरक्षण मंत्री मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर यांचे निधन. (जन्म : १३ डिसेंबर १९५५)
जन्म :
१८६४: भारतीय अभियंता जोसेफ बाप्टीस्ता यांचा जन्म.
१९०९: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००१)
१९२७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म.