तज्ज्ञ संचालक म्हणून दिलीपराव देशमुख यांच्या निवडीचे स्वागत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर: महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड झाल्याबद्दल बुधवारी आशियाना बंगल्यावर मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने, विविध संस्था पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला

त्यांचा मांजरा, रेणा, मारुती महाराज साखर कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणाचे संचालक यशवंत पाटील, रेणाचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, संचालक प्रवीण पाटील, स्नेहल देशमुख, शिखंडी हरवाडीकर, राम माने, बाळासाहेब जाधव, मांजराचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, संचालक महेंद्र भादेकर, ज्ञानेश्वर भिसे आदी उपस्थित होते.

माजी मंत्री आ. अमित देशमुख, माजी मंत्री आ. राजेश टोपे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. धीरज देशमुख, आ. बाबासाहेब पाटील, खा. प्रताप पाटील चिखलीकर, आ. सुरेश वरपुडकर, आ. प्रणिती शिंदे, प्रतीक पाटील यांनी मोबाईल कॉल करून शुभेच्छा दिल्या.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »