‘डीएसटीए’चा शुगर एक्स्पो २४ पासून

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : ‘डीएसटीए’ अर्थात दी डेक्कन शुगर टेक्नॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) च्या वतीने येत्या २४ आणि २५ सप्टेंबर रोजी ६८ वे वार्षिक अधिवेशन आणि शुगर एक्स्पोचे आयोजन जे. डब्ल्यू. मॅरिऑट हॉटेलमध्ये करण्यात आले आहे.

सकाळी ११ वाजता उद्‌घाटन सोहळा सुरू होईल. दरवर्षी हे अधिवेशन आणि शुगर एक्सपो आयोजित करण्यात येत आहे, त्याला साखर उद्योग क्षेत्रातील नामवंत उपस्थित राहतात. साखर उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञाना वर सखोल विचार मंथन होत असते. अनेक रिसर्च पेपर मांडले जातात. यावेळीही 45 शोध निबंध (रिसर्च पेपर्स) सादर केले जातील. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह विविध तांत्रिक विषया वर नामवंतांचे विचार ऐकायला मिळणार आहेत, असे डीएसटीएने कळवले आहे.


शुगर एक्स्पोमध्ये देशातील नामवंत कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. त्यामुळे साखर उद्योगातील नवे तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे.

शुगर एक्स्पोला आवर्जून भेट देण्याचे आवाहन डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्र) व अधिवेशनाचे अध्यक्ष एस. एस. शिरगावकर, उपाध्यक्ष एम. के. पटेल (गुजरात), उपाध्यक्ष (तंत्र) एस. डी. बोखारे आणि कार्यकारी सचिव गौरी पवार यांनी केले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »