हरियाणाचा जुनाच दर, रू ३५५० प्रति टन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

यंदा पंजाबच नंबर वन

कर्नाल : उसाच्या एसएपीमध्ये (स्टेट ॲडव्हाझरी प्राइस) वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू असले तरी, राज्य सरकारने मागच्या हंगामाचाच दर, रू. ३५५० कायम ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

दुसरीकडे पंजाब सरकारने प्रति टन ३३०० वरून थेट रू. ३८०० दर केल्याने ते देशात सर्वाधिक ऊस दर देणारे राज्य ठरले आहे. यापूर्वी हा मान हरियाणाकडे होता. उत्तरेकडील बऱ्याच राज्यांमध्ये एफआरपीऐवजी एसएपी दिला जातो.

हंगाम 2022-23 मध्ये पुरवठा करण्यात आलेल्या उसाच्या किंमतीबाबत सरकारने राज्यपालांच्या सहीने नुकतेच परिपत्रक जारी केले. त्यानुसार उत्तम दर्जाच्या उसासाठी रू. 3620 आणि दुय्यम दर्जाच्या उसासाठी 3550 प्रति टन जाहीर केला आहे.

तथापि, या निर्णयामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी खवळले आहेत, ते निविष्ठ खर्चात वाढ झाल्यामुळे उसाचा एसएपी ₹ 4500 प्रति टन निश्चित करण्याची मागणी करत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »