साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यावर नवी जबाबदारी

मुंबई : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची बदली मुंबईत झाली आहे. याबाबतचा आदेश काही वेळापूर्वीच जारी करण्यात आला.
सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे. मंगळवारी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची बदली आता मुंबईमध्ये एमआयडीसी सहव्यवस्थापक म्हणून करण्यात आली आहे. तर सांगलीचे जिल्हाधिकारी मंतदा राजा दयानिधी यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ‘सारथी’चे एमडी अशोक काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
- डॉ कुणाल खेमनार, आयुक्त साखर, पुणे यांची बदली एमआयडीसीचे सहसीईओ (Jt CEO).
- मंतदा राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली यांची सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक (Jt MD )पदावर.
- अशोक काकडे, एमडी सारथी यांची जिल्हाधिकारी सांगली येथे बदली
- अनमोल सागर, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त.
गेल्याच आठवड्यात राज्यातील 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात येत असल्याचं दिसून येतंय.
मागच्या आठवड्यातील बदल्या
- प्रवीण दराडे (IAS:RR:1998) यांची प्रधान सचिव, (सहकार आणि विपणन), सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री पंकज कुमार (IAS:RR:2002) यांची सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री नितीन पाटील (IAS:SCS:2007) सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्रीमती श्वेता सिंघल (IAS:RR:2009) राज्यपालांच्या सचिव, महाराष्ट्र यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. प्रशांत नरनावरे, (IAS:RR:2009) सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री अनिल भंडारी (IAS:RR:2010) सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री पी.के.डांगे (IAS:SCS:2011) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांची सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री एस. राममूर्ती (IAS:RR:2013) सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री अभिजित राऊत (IAS:RR:2013) जिल्हाधिकारी, नांदेड यांची सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री मिलिंदकुमार साळवे (IAS:SCS:2013) सह आयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर यांची, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री राहुल कर्डिले (IAS:RR:2015) सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची जिल्हाधिकारी, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्रीमती. माधवी सरदेशमुख (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली यांची संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री अमित रंजन (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, चारमोशी उपविभाग, गडचिरोली यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा, आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.