एकरी शंभर टन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा

दौंड : मलठण (ता. दौंड) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे महाराष्ट्र कृषी विभाग व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान व ऊस पाचट व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी पर्यवेक्षक शिवाजी कदम यांनी प्रास्ताविक करून शेतकऱ्यांना ऊस पाचट व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
गणेश घोरपडे यांनी एकरी १०० टन ऊस उत्पादन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. ऊस पाचट व्यवस्थापन पाचट कुट्टी प्रात्यक्षिक हे बापू शेळके यांच्या शेतावर घेण्यात आले. यावेळी माऊली चव्हाण, अमित गिरमकर, नवनाथ थोरात, गणेश देवकाते, बापूराव वाघमोडे, शशिकांत शेळके, बाळासाहेब भोसले, भरत थोरात आणि शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.