यंदा संपूर्ण गाळप होणार : आमदार निलंगेकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

निलंगा : अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना हा ओंकार शुगर्स प्रा. लि.ने भाडेतत्त्वावर चालवण्यास घेऊन हंगाम सुरू केला आहे.

माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी कारखाना भेट देऊन गाळप हंगामाची पाहणी केली. यंदा संपूर्ण गाळप करण्याची सूचनो केली. लवकरच कारखाना अधिक गतीने गाळप करेल, असा विश्वास देऊन शेतकऱ्यांना योग्य भाव दिला जाईल, असा विश्वास त्यांनी दिला.

निलंगेकर म्हणाले, कारखाना प्रशासनाने या गाळपासाठी ज्या उसाची नोंद केली आहे. त्यांच्या उसाला प्राधान्य देऊन तो ऊस वेळेत गाळप केला जाईल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »