असे असेल EPFO चे वाढीव पेंशन

सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 4 नोव्हेम्बर 2022 च्या निकालास अनुसरण EPFO ने पेंशनबाबत मार्गदर्शक सूचनाचे परिपत्रक दिनांक 29 डिसेम्बर 2022 रोजी जारी केले. त्यानंतर त्यावर पुन्हा दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी स्पष्टीकरण जारी केले त्यानुसार-
1)दिनांक 1 सप्टेम्बर 2014 रोजी कामावर असलेल्या व त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वास्तविक वेतनावर पेंशन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
2)सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ज्यांची EPS कपात ₹5000,₹6500 व ₹15000 हे कमाल वेतन गृहीत धरुन झाली आहे. त्यांना वास्तविक वेतन व कमाल वेतन यमधील फरकावर 8.33%नुसार EPS खात्यात रककम जमा करावी लागेल.
यावर जे व्याज ठरवले जाईल ते व्याजही भरावे लागेल. उदाहरणार्थ ज्याचे वेतन ₹1.00 लाख आहे, त्याला 100000-15000=85000 या रककमेवर 8.33 प्रमाणे येणारी रक्कम ₹8330-1250 =₹7080 दरमहा प्रमाणे व तेव्हढाच म्हणजे ₹ 7080 मालकाचा वाटा.
त्यापूर्वीची रक्कम वास्तविक वेतन -5000=फरक तसेच वास्तविक वेतन -6500=फरक याप्रमाने गणना करून त्यावर येणारे व्याजसह परत करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे त्यावर कर्मचाऱ्यांना मिळालेले मालकाचे योगदान employers contribution सुद्धा परत करावे लागणार आहे. या रक्कमेवर सरकार ठरवेल त्या दराने व्याज द्यावे लागणार आहे.
हे व्याज किमान 8.5% ते कमाल 10.50% दरसाल दरशेकडा या दराने भरण्याची पाळी येणार आहे. सरकार किंवा EPFO विना व्याज फ़क्त फरक घेईल असे समजणे चुकीचे ठरेल.
3) त्यानंतर सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्याकडून घ्यावयाचा 1.16% केंद्र सरकार देत असलेला वाटा 6 महिन्यासाठी स्थगित केला आहे. उद्या कोर्टाने स्थगिती उठवली तर सध्या केंद्र सरकार देत असलेला 1.16% वाटा देखील कर्मचाऱ्यांना ध्यावा लागू शकतो.
4) कर्मचार्यांनी परत करावयाची रक्कम प्रचंड असल्याने अरियर्स मधून एडजस्ट केली जाणार नाही हे नक्की. याचाच अर्थ सर्वांना रोख रककम भरावी लागणार आहे.
5)जे कर्मचारी 2014 -15 मधे सेवानिवृत्त झाले, त्यांना देय रककम व मिळणारे अरियर्स साधारणत:सारखे (matching) असू शकतात. त्यांच्यासाठी वाढीव पेंशन ही खूप फायद्याची बाब ठरेल. जे 2020-22 मधे निवृत्त झाले त्यांना भरावयाची रक्कम जास्त व अरियर्स फार कमी अशी स्थिती राहील.मात्र एव्हढी मोठी रककम सीपीएफ सेक्शनला भरण्याची किती लोकांची क्षमता आहे, हा ही प्रश्न आहेच!
6)EPFO च्या नियमाप्रमाणे 20 वर्षावरील सेवा झालेल्या कर्मचाऱ्याला त्याची सेवा +2 वर्षाचे बेनिफिट Xत्याचे वेतन÷70 या सूत्रानुसार पेंशन लागू होईल.
7)कर्मचाऱ्याचे वेतन म्हणजे ज़्या रककमेवर त्याचा सीपीएफ कापला गेला ती रककम होय.
8) पेंशनसाठी वेतनाची गणना करताना मागील पाच वर्षाच्या वेतनाची सरासरी काढून वेतन ठरविले जाईल. उदाहरणार्थ 2018 मधे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचे वेतन 2015 मधे ₹52000,2015मधे 54000,2016मधे ₹56000,2017 मधे 58000 तर 2018 मधे ₹60000 असेल तर त्याला पेंशन देताना त्याची पेंशन ठरवताना ₹56000हजार वेतन गृहीत धरल्या जाईल. शेवटचे वेतन ₹60000 नाही.
9) कर्मचारी हयात असेपर्यंत त्याला वरील क्रमांक 7 नुसार निश्चित केलेली पेंशन मिळेल. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी /पतिस अर्धी रककम मिळेल. दोघेही गेल्यावर पेंशन बंद होईल. कर्मचाऱ्याने सीपीएफ ला जमा केलेली रककम EPFO च्या खाती कायमची पचती राहील.
10) ज्यांची प्रकृति चांगली आहे. ज्यांना जीवघेणे आजार नाहीत. ज्यांची किमान 10 वर्ष अजून जगण्याची हमी देता येते त्यांना वाढीव पेंशन घेणे खूप परवडते.
पण ज्यांना तिसऱ्या चवथ्या स्टेजचा कैंसर आहे, ब्रेन हेमरेज, हार्ट बायपास इत्यादिच्या पेशंटनी सारासार विचार करून वाढीव पेंशनचा विकल्प निवडावा. कारण कर्मचारी गेल्यावर पेंशन अर्धी होते व महागाई वाढली किंवा वेतन आयोग बसले तरी एकदा ठरलेल्या पेंशनमधे वाढ होत नाही.
11) ज्यांचा पती /पत्नी हयात नाहीत त्यांनी वाढीव
पेंशनसाठी विकल्प सादर करताना दहा वेळ विचार करावा कारण त्यांच्या हयातीनंतर पेंशन बंद व त्यांनी भरलेला पैसा EPFO जमा असे होणार आहे.माझे मत असे आहे ज़्या कर्मचाऱ्याचा जोड़ीदार हयात नाही त्याने वाढीव पेंशन घेण्याच्या भाणगडीत पडूच नये.
त्यांनी EPFO ला जितकी रक्कम भरायची ती रक्कम बँकेत फिक्स्ड डिपॉज़िटमधे ठेवावी. सध्या अनेक बँका वरिष्ठ नागरिकांना 8 ते 8.5 % व्याज देत आहेत. त्यानुसार डिपॉज़िट केलेल्या रक्कमेवर वाढीव पेंशनच्या बरोबरीत किंवा पाच दहा टक्के कमी व्याज मिळेल पण त्यांच्याजवळ EPFO ला भरावयाची मोठी रक्कम जसे प्रकरणपरत्वे 20 ते 40 लाखाची रककम सूरक्षित राहील. ती रक्कम कधीही अडचण आल्यास, तब्बेतीच्या कारणास्तव वापरता येईल.
12) 4 नोव्हेम्बर 2022 च्या निकालावर सुप्रीम कोर्टात 7 रिव्यु पिटीशन /Misc. एप्लीकेशन दाखल झाल्या आहेत त्यामधे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.
1) 1 सप्टेम्बर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्यानाही वाढीव पेंशन लागू करावी. कारण RC Gupta केस मधील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने upheld केला आहे.व 2) सरासरी वेतनाची गणना 60 महिन्याच्या वेतनावर न करता शेवटच्या 12 महिन्याच्या वेतनावर करावी.
या पिटीशनचा कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागल्यास सर्वात मोठा फायदा त्यांनाच होणार आहे. कारण त्यांचे अरियर्स किमान 10 वर्षाचे असणार आहेत. मी केलेल्या गणिताप्रमाणे EPFO ला पैसे परत केल्यावर अरियर्स व वाढीव पेंशन स्वरूपात आपले भरलेले फर्काचे पैसे परत मिळण्यासाठी 10 वर्ष लागतात.
किमान 10 वर्ष आपलेच पैसे आपणास मिळतात व त्यानंतर break even म्हणजे नफा होने सुरु होते.2013 पूर्वीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीस 10 वर्ष पूर्ण होत असल्याने जर कोर्टाचा निकाल 1 सप्टेम्बर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या बाजूने लागला तर या लोकांना पहिल्या महिन्यापासूनच नफ़याच्या स्वरूपात वाढीव पेंशन मिळू शकेल. जो आधी निवृत त्याचा नफा जास्त व जोखिम कमी. जो उशीरा निवृत्त त्याला नफा होण्यास उशीर व जोखिम जास्त!
13)मी स्वत:च्या पेंशनबावत गणित केले असता खालीलप्रमाणे उत्तर मिळाले.
अ )सेवानिवृत्तीच्या समयीच्या वर्षात म्हणजे 2018 मधे माझे मूळ वेतन व महगाई भत्ता ₹60000 असा होता. 2017 ला ₹48000,2016ला 46000,2015 ला 44000 व 2014 ला 42000 याप्रमाणे होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे 5 वर्षाचे सरासरी वेतन पेंशनसाठी गृहीत धरायचे असल्याने ₹48000X23 वर्ष सेवा +2 वर्ष बोनस =25वर्ष ÷70या सूत्रानुसार मला 17142 पेंशन मिळेल.15/11/95 पूर्वीची सेवा 14 वर्ष.
त्या सेवेबाबत सुमारे 200 अशी एकूण 17400 पेंशन मिळेल.
मला 15 नोव्हेम्बर 95 पासून ते सेवानिवृत्तिपर्यंत 8.33 %या नुसार फरकाची रक्कम सुमारे 20 लाख व त्यावरील पाच वर्षाचे व्याज सुमारे 8 लाख असे एकूण 28 लाख EPF0 ला भरावे लागणार आहेत. मला आज ₹3236 रुपये पेंशन मिळत आहे.
ती वजा जाता मला दरमहा सुमारे 14200 वाढीव पेंशन मिळेल. आणि वाढीव पेंशनसाठी मला सुमारे 28 लाख सरकारजमा करावे लागतील ते ही कायमचे! आज वरिष्ठ नागरिकांना मिळणारे व्याज पाहता 8% व्याज सर्वसाधरणपणे सर्वच बँका देत आहेत.
28 लाखावर येणारे 8 टक्के प्रमाणे व्याज ₹224000 म्हणजेच मासिक व्याज ₹18666! म्हणजे वाढीव पेंशनसा ठी मी 28 लाख सरकारकडे EPFO ला भरून सुद्धा मला साधारणत:₹17400 पेंशन मिळेल. आणि वाढीव पेंशन न घेता जूनीच पेंशन चालू ठेवली तर ₹3236 पेंशन मिळत राहील आणि जी 28 लाखाची रककम EPFO ला भरायची आहे ती तिथे न भरता बँकेत ठेवली तर 8%प्रमाणे व्याज ₹18666 मिळेल शिवाय जूनी पेंशन ₹3236 वेगळी!म्हणजे एकूण सुमारे ₹22000 दरमहा.
व्याजाचा दर कमी झाला तर साधारणत: 2000 रूपये महीन्याचा फरक पडेल व 2000 कमी व्याज मिळेल तरीही ₹20000 दर महा हाती येतीलच आणि महत्वाचे म्हणजे अड़ीअडचणीसाठी, तातडिच्या वैद्यकीय खर्चासाठी आपली 28 लाख इतकी मोठी रककम आपल्या जवळ राहील, ती एक हिम्मत! मी मेल्यावर पेंशन अर्धी होईल पण बँकेचे व्याज मला मिळते त्याच दराने मिळेल.
म्हणजे पत्नीला जास्त आर्थिक सुरक्षा मिळेल! आणि पत्नी गेली तर मुलांना त्या पैशाचा उपयोग घेता येईल. व्याज घेता येईल आणि मुद्दल जसे च्या तसे राहील किंवा मुद्दल कोणत्याही काम धंद्यासाठी वापरता येईल. EPFO मधे पैसे भरले की ते कायमचे बुड़ीत खाती जमा होणार! वरील उदाहरण पाहिल्यास EPFO ची वाढीव पेंशन मला तरी मृगजळासारखीच वाटत आहे. अर्थात प्रत्येकाचे मत व प्रत्येकाची परिस्थिति वेगवेगळी असल्याने प्रत्येकाने आपले स्वत:चे गणित करून निर्णय घ्यावा.