आज राष्ट्रीय विज्ञान दिन

आज मंगळवार, फेब्रुवारी २८, २०२३ रोजीचे
पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन ९, शके १९४४
सूर्योदय : ०६:५९ सूर्यास्त : १८:४३
चंद्रोदय : १२:४३ चंद्रास्त : ०२:३३, मार्च ०१
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : नवमी – ०४:१८, मार्च ०१ पर्यंत
नक्षत्र : रोहिणी – ०७:२० पर्यंत
योग : विष्कम्भ – १६:२६ पर्यंत
करण : बालव – १५:१६ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०४:१८, मार्च ०१ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : वृषभ – २०:३२ पर्यंत
राहुकाल : १५:४७ ते १७:१५
गुलिक काल : १२:५१ ते १४:१९
यमगण्ड : ०९:५५ ते ११:२३
अभिजित मुहूर्त : १२:२८ ते १३:१५
दुर्मुहूर्त : ०९:२० ते १०:०७
दुर्मुहूर्त : २३:३७ ते ००:२६, मार्च ०१
अमृत काल : ००:०८, मार्च ०१ ते ०१:५४, मार्च ०१
वर्ज्य : १३:३१ ते १५:१७
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील मोठा शोध लावला होता. तो म्हणजे प्रकाशाच्या विकिरणाचा शोध. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या संशोधनाला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले आहे.
आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे
• १९६३: भारतरत्न’ सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८४)
। राष्ट्रस्वातंत्र्य द्या, हिंदभूला नवे।। धर्म-स्वातंत्र्य तें हिंदभूला हवे!
।ज्ञानस्वातंत्र्य ती प्रार्थुनी मागते।। हिंदभू वांछिते सकल स्वातंत्र्य तें!
अशा काव्यांतून स्वातंत्र्याची ललकारी देणारे, राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण करणारे आद्य कवी म्हणून कवी गोविंद यांचा उल्लेख केला जातो. स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका वठविणाऱ्या सावरकरांच्या अभिनव भारत ऊर्फ मित्रमेळा संघटनेच्या कार्यात कवी व एक मुत्सद्दी म्हणून त्यांनी भूमिका निभावली होती. काव्य, कवित्व व स्वातंत्र्यत्व ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती.
हिंदभू वांछिते विगत स्वातंत्र्य तें, भारतप्रशस्ती, महाराष्ट्रगीत, स्वातंत्र्य सकल सुखानेही समर्पुनि कधी पुरविशिल काम, मुरली, शिवबाचा दरबार, धावं रे धांव भगवंता, टिळकांची भूपाळी, जिजाईने बालशिवाजीस दिलेला झोका आदी कवितांनी पारतंत्र्याच्या काळात गोविंदाग्रज घराघरांत पोचले होते. मेळावे, सभा-संमेलनांत त्यांच्या काव्यगायनामुळे अनेक स्वातंत्र्यसेनानींना ब्रिटिशांनी शिक्षा केल्याच्याही नोंदी आढळतात.
१९१०च्या दशकात गोविंदांचे काव्य सरकार जमा झाल्याच्या नोंदी आढळतात. पण प्रत्यक्षात त्याचे पुढे काय झाले, याबाबत विशेष माहिती मिळत नाही. गोविंद यांच्या मृत्यूनंतर (१९२६) त्यांच्या काही मित्रांनी त्यांची उरलेली कवने प्रसिद्ध केली होती.
• १९२६: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १८७४ – नाशिक)
रवींद्र जैन

अंध म्हणून जन्माला आलेल्या रवींद्र जैन यांना लहानपणापासून संगीताचा एक वेगळाच ‘कान’ होता. जैन मंदिरांमध्ये ते लहानपणी भजन गात असत. त्यांची संगीतातील रुची पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी पंडित जनार्दन शर्मा आणि पंडित नथू राम यांच्याकडे पाठवले.
ऑल इंडिया रेडिओ’साठी रेकॉर्डिंग करत असताना जैन यांची राधेश्याम झुनझुनवाला यांच्याशी ओळख झाली व त्यांनी जैन यांना मुंबईत आणले. मुंबईत आल्यावर जैन यांनी मोठमोठ्या निर्मात्यांसोबत काम करायला सुरुवात केली.
१९७२ मध्ये जैन यांनी संगीतकार म्हणून आपल्या करिअरला ‘कॉंच और हिरा’ या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. महंमद रफी यांच्या आवाजात त्यांनी आपले पहिले गाणे संगीतबद्ध केले होते. मात्र, ते गाणे रिलीज झाले नव्हते.
१९७०च्या दशकामध्ये रवींद्र जैन यांनी त्यांनी संगीत दिलेले चित्रपट गाजले. राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून त्यांची ओळख होती. राज कपूर यांनी ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. रवींद्र जैन यांनी हिंदीप्रमाणेच गुजराथी, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, मल्याळी, तेलुगू, राजस्थानी अशा विविध भाषांतील एकूण सुमारे १५० चित्रपटांना संगीत दिले.
हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ संपल्यानंतर ज्या काही मोजक्याच संगीतकारांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं वेगळेपण जपलं, त्यामध्ये रवींद्र जैन यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. रवींद्र जैन यांनी ७० आणि ८० च्या दशकात संगीत दिलेली अनेक गाणी अजरामर झाली. संगीतकार असणारे रवींद्र जैन गीतकारही असल्यामुळे या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पेलल्या. मेलडी आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत यांचा सुरेख मेळ त्यांनी आपल्या संगीतामध्ये घातला.
प्रत्येक संगीतकाराला सतत नव्या आवाजाचाही शोध असतो. जैन यांना असा एक आवाज सापडला आणि त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवी खुमारी अवतरली. येसूदास यांच्यासारख्या दक्षिणी चित्रपटातील लोकप्रिय गायकाला त्यांनी हिंदी चित्रपटाच्या दुनियेत आणले, रवींद्र जैन यांचे भक्ति संगीताचे काही आल्बम आहेत. मॉर्निंग सन’ हा त्यांचा आल्बम विशेष प्रसिद्ध आहे.
१९४४: संगीतकार व गीतकार रविन्द्र जैन यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर, २०१५)
घटना :
१८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.
१९२२: इजिप्तला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
१९३५: वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.
१९४०: बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.
*• मृत्यू : *
• १९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट , १८९९)
• १९६६: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट, १८९८)
• १९९५: कथा, संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत उर्फ कवी संजीव यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल, १९१४)
• १९९८: अभिनेते राजा गोसावी यांचे निधन. (जन्म: २८ मार्च , १९२५)
• १९९९: औध संस्थानचे राजे भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांचे निधन.
जन्म :
१८९७: मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट, १९७४)
१९२७: भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै, २००२)
१९२९: भारतीय-अमेरिकन संशोधक रंगास्वामी श्रीनिवासन यांचा जन्म.
१९४८: ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांचा जन्म.
१९४८ : भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक बिनेंश्वर ब्रह्मा यांचा जन्म ( बोडो अतिरेक्यांकडून हत्या : १९ ऑगस्ट, २००० )
• १९५१: भारतीय क्रिकेटपटू करसन घावरी यांचा जन्म.