पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट ला सहकार गौरव पुरस्कार

उस्मानाबाद : पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीला राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने मानाचा सहकार गौरव पुरस्कार 2022 देवून सन्मानित करण्यात आले.
शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहकार गौरव पुरस्काराचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
माजी केंद्रीय रेल्वेमंत्री तथा सहकार संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, केंद्रीय निबंधक सहकार मंत्रालय श्री. विजयकुमार, खासदार हेमंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, सतीश मराठे, बँक ऑफ इंडियाचे माजी संचालक अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, राष्ट्रीय महामंत्री सहकार भारती उदयजी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.