गणित तज्ज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सुप्रभात

आज मंगळवार, जानेवारी १७, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष


युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज पौष २७, शके १९४४
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२२
चंद्रोदय : ०३:२४, जानेवारी १८ चंद्रास्त : १३:५१
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : दशमी – १८:०५ पर्यंत
नक्षत्र : विशाखा – १८:४६ पर्यंत
योग : शूल – ०८:३५ पर्यंत
क्षय योग : गण्ड – ०५:५९, जानेवारी १८ पर्यंत
करण : विष्टि – १८:०५ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०५:१०, जानेवारी १८ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : तूळ – १३:०० पर्यंत
राहुकाल : १५:३५ ते १६:५९
गुलिक काल : १२:४९ ते १४:१२
यमगण्ड : १०:०२ ते ११:२५
अभिजित मुहूर्त : १२:२६ ते १३:११
दुर्मुहूर्त : ०९:२८ ते १०:१३
दुर्मुहूर्त : २३:३१ ते ००:२३, जानेवारी १८
अमृत काल : १०:१२ ते ११:४५
वर्ज्य : २२:३२ ते ००:०३, जानेवारी १८

ज्योती बसू

भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. १९६७ आणि १९६९ मध्ये बसूंनी पश्चिम बंगालचे उपमुख्यमंत्रीपद सांभाळले. त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केला आहे. ते इ.स. १९६४ ते २००८ पर्यंत सीपीएम पॉलिट ब्यूरोचे सदस्य होते.

पक्की वैचारिक बैठक, सातत्याने २३ वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद सांभाळताना शेतकरी-श्रमिकांच्या भल्यासाठी हाती घेतलेल्या अनेक योजना, राष्ट्रीय रंगमंचावर बजावलेली महत्त्वाची भूमिका, केंदातील आघाड्यांची गणिते मांडण्याची व सोडवण्याची कुशलता, हुकलेले पंतप्रधानपद आदी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीदीर्ची वैशिष्ट्ये सांगता येतील.

१९४६ च्या निवडणुकांत काँग्रेसचे उमेदवार हुमायुन कबिर यांचा रेल्वे मतदारसंघातून पराभव करून बसू यांनी राजकीय पटलावर प्रवेश केला.
१९८७ मध्ये देशातील प्रमुख इंग्रजी दैनिकांनी केलेल्या निरीक्षणात सर्वाधिक ‘इमानदार’ म्हणून ज्योती बसू यांची निवड झाली होती. त्यांची गणना लालबहादूर शास्त्री आणि जवाहरलाल नेहरू अशा नेत्यांमध्ये होऊ शकते, असे मत वृत्तपत्रांनी व्यक्त केले होते.

त्यांचे विरोधकदेखील त्यांना योग्य आणि व्यावहारिक प्रशासक मानत. ज्योती बसू पश्चिम बंगालमध्ये असताना तेथे काँग्रेस सत्तेवर येऊच शकत नाही, असे खुद्द काँग्रेस नेतेच म्हणत.
*• २०१० : प. बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू यांचे निधन. (जन्म: ८ जुलै , १९१४)

भारतीय गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर –

देवळालीमध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रॅंग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२ मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता.

नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे.
महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते.

१९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित MATHEMATICAL GAMES या सदराखाली SCIENTIFIC AMERICAN या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले.

स्वीडनच्या WORLD DICTIONARY OF MATHEMATICS या ग्रंथात द.रा. कापरेकरांच्या नावाचा अंतर्भाव केला आहे. STEFANU ELIAS ALOYSIUS या लेखकाने “D.R. KAPREKAR’ नावाचे कापरेकरांचे चरित्र लिहिले आहे.

मुंबईत१९२३साली रोज डोंबिवलीपर्यंतचा लोकलचा प्रवास करताना कापरेकरांचे लक्ष वाटेत दिसणाऱ्या आगगाडीच्या डब्यांच्या नंबरांकडे असे. या आकड्यांचा विचार करताना कापरेकरांना एका नवीनच प्रकारच्या संख्यांचा शोध लागला. डोंबिवली स्टेशनच्या नावावरून कापरेकरांनी या संख्यांना डेम्लो संख्या असे नाव दिले.

काही डेम्लो संख्या १६५, १७६, २५५३, १७७६, ४७७७३, १७७७६, वगैरे. या संख्यांचे तीन हिश्श्यांमध्ये विभागले गेले आहेत. प हा पहिला हिस्सा, श म्हणजे शेवटचा हिस्सा आणि मन म्हणजे मधला हिस्सा. प आणि श ची बेरीज करून जो आकडा येईल तो न वेळा मन मध्ये असतो.
१६५ मध्ये १=५=६ म्हणून ६ हा आकडा मधे आला आहे.
१७७७६ मध्ये १=६=७. म्हणून ७ हा आकडा (तीन वेळा) मधे आला आहे.)
१९०५ : भारतीय गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म. (मृत्यू : सन, १९८६)

घटना :
१७७३: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
१९१२: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.
१९४५: दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
१९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (UNITED NATIONS SECURITY COUNCIL) पहिली बैठक झाली.
१९५६: बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.

मृत्यू :
• १७७१: पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन यांचे निधन.
• १८९५: मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी, १८९५)
• १९३०: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचे निधन. (जन्म: २६ जून १८७३)
• १९७१: स्वातंत्रसैनिक, घटनातज्ज्ञ बॅ. नाथ बापू पै यांचे ह्रुदयविकाराने निधन. (जन्म: २५ सप्टेंबर, १९२२)
• १९८८: अभिनेत्री लीला मिश्रा यांचे निधन.
• १९९५: ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांचे निधन.
• २०००: गायक आणि अभिनेते सुरेश हळदणकर यांचे निधन.
• २०१३: मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या ज्योत्स्ना देवधर यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी, १९२६)
• २०१४: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल, १९३१ – पाबना, बांगला देश)
• २०२२ : प्रा.डॉ. नारायण ज्ञानदेव पाटील ( एन.डी.पाटील ) नारायण ज्ञानदेव पाटील यांचे निधन ( जन्म : १५ जुलै १९२९ )
• २०२२ : लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांचे निधन ( जन्म : ०४ फेब्रुवारी, १९३८ )

जन्म :
१८९५: लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे, १९७८)
१९०६: भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २०००)
१९०८: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९९४)
१९१७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर , १९८७)
१९१८: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे२०१४)
१९१८: चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ ’कमाल अमरोही यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)
१९३२: साहित्यिक मधुकर केचे यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९३)

आपला दिवस मंगलमय जावो

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »