कलामहर्षी बाबूराव पेंटर

सुप्रभात।
आज सोमवार, जानेवारी १६, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज पौष २६, शके १९४४
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२२
चंद्रोदय : ०२:२२, जानेवारी १७ चंद्रास्त : १३:०८
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : नवमी – १९:२० पर्यंत
नक्षत्र : स्वाती – १९:२३ पर्यंत
योग : धृति – १०:३२ पर्यंत
करण : तैतिल – ०७:३९ पर्यंत
द्वितीय करण : गर – १९:२० पर्यंत
क्षय करण : वणिज – ०६:४९, जानेवारी १७ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : ०८:३८ ते १०:०१
गुलिक काल : १४:१२ ते १५:३५
यमगण्ड : ११:२५ ते १२:४८
अभिजित मुहूर्त : १२:२६ ते १३:१०
दुर्मुहूर्त : १३:१० ते १३:५५
दुर्मुहूर्त : १५:२४ ते १६:०८
अमृत काल : १०:३१ ते १२:०८
वर्ज्य : ००:५१, जानेवारी १७ ते ०२:२४, जानेवारी १७
अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश –
महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली.
लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी ‘मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष’ या विषयावर निबंध लिहिला.
पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळे; बक्षिसेही मिळत.
१८६२ साली ते मॅट्रिक तर १८६४ साली एम. ए. झाले. त्या वेळी अलेक्झांडर ग्रॅन्ट यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. या काळात माधवरावांनी विविध विषयांवर निबंधलेखन केले.
इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले आणि त्यात त्यांनी अधिकारही प्राप्त केला होता. त्यांनी अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशा कामांमध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवली.
त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. इ.स. १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली. काही काळ त्यांनी शिक्षक, संस्थानाचे सचिव, जिल्हा न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले. इ.स. १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.
भारतीय समाजात संकुचित वृत्ती; जातिभेदांचे पालन; भौतिक सुखे, व्यावसायिकता व व्यावहारिकता यांविषयाचे गैरसमज यांसारखे दोष निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
हे दोष दूर करूनच आपल्या समाजाची प्रगती साधता येईल असे त्यांचे ठाम मत होते. समाजाची राजकीय किंवा आर्थिक उन्नती घडवून आणायची असेल, तर सामाजिक सुधारणेकडे लक्ष पुरविले पाहिजे. “ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही” असे त्यांचे मत होते.
हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना ‘भारतीय उदारमतवादाचे उद्गाते’, असेही म्हटले जाते.
• १९०९: समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८४२)
दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी
– दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला.
पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत! बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते एक चतुरस्र् कलाकार होते.
कलाव्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मुंबईत १९०८-०९च्या सुमारास फोटोग्राफीचा स्टुडिओ सुरू केला. पुढे केशवराव भोसले, बालगंधर्व यांच्या नाटकांसाठी पडदे रंगवले, इतकेच नव्हे तर त्यांनी ‘गंधर्व कंपनी’ला वेशभूषा, अलंकार, आभूषणे इत्यादींची डिझाइन्सही करून दिली. स्मारक-शिल्पे करण्यात तर त्यांचा हातखंडा होता. ज्या काळात चित्रपटनिर्मितीसाठी लागणा-या मूलभूत सुविधा, यंत्रसामग्रीही उपलब्ध नव्हती, त्या काळात बाबूरावांनी चित्रपटनिर्मितीचे साहस केले.
१९१७ मध्ये कोल्हापूरला त्यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ स्थापन केली व जवळजवळ २६ चित्रपटांची निर्मिती केली. ‘सावकारी पाश’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. हा चित्रपट चित्रपटनिर्मितीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड समजण्यात येतो. झुंजारराव पवार, व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, अनसूयाबाई आदींनी त्यात भूमिका केल्या होत्या.
बाबूराव हे स्वत: उत्तम इंजिनीअर व संकलक होते. आपल्याला चित्रीकरणासाठी लागणारा हवा तसा कॅमेरा त्यांनी स्वत: बनवून घेतला होता. ते सिनेमाचे पोस्टर, फोटो पाहूनच आपले आगामी सिनेमाविषयीचे मत बनवणार, हे गृहीत धरून बाबूरावांनी आपल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’च्या ‘सिंहगड’ (१९२३) या चित्रपटाची लक्षवेधक पोस्टर्स तयार करून ग्रँट रोडचे ‘नॉव्हेल्टी थिएटर’ असे काही सजवले-नटवले की, त्या काळी अर्धी मुंबई खास ‘नॉव्हेल्टी’ पाहायला तिथे लोटली होती.
त्यांचे ‘सिंहगड’चे पोस्टर काळाच्या ओघात नष्ट झाले; पण त्यांच्या ‘सतिसावित्री’, ‘कल्याण खजिना’, ‘सावकारी पाश’,‘शाहीर रामजोशी’ आदी चित्रपटांची पोस्टर्स, ‘उषा’ चित्रपटांचे बुकलेट आजही पाहायला मिळते, ही सर्व चित्रे म्हणजे दुर्मीळ कलेक्टर्स आयटम्स आहेत. आपल्या स्टुडिओत चित्र रंगवण्यासाठी चित्रफलकाच्या आधारासाठी लागणारा ईझल त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने डिझाइन केला होता. त्या ईझलसमोर एका जागेवर बसून चित्रकर्त्यांला काम करता येई.
त्यांनी चित्रफलक वर-खाली करण्यासाठी व कोणत्याही उंचीवर स्थिर करण्यासाठी ईझलमध्ये पायाने दाबण्याच्या पॅडलची व्यवस्था केली होती. अशी सुविधा असलेला ईझल कुठल्याही पेंटरकडे नव्हता. बाबूराव उत्तम मोटार मेकॅनिकही होते. बोलपटांचे आगमन झाल्यावर ध्वनीने, दृश्यकलेवर आक्रमण केले असे समजून बाबूराव पेंटरांनी सिनेउद्योगातून निवृत्ती पत्करली. पण त्याआधी त्यांनी व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, दामले, फत्तेलाल, धायबर असे शिष्योत्तम तयार केले.सतत कलेचा ध्यास आणि नावीन्याचा शोध घेण्यात बाबूरावांनी आपली उभी हयात घालविली.
• १९५४ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन. (जन्म: ३ जून, १८९०)
घटना :
१६६०: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
१६६६: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला.
१६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.
१९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.
१९१९: अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.
१९२०: अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (LEAGUE OF NATIONS) पहिली बैठक झाली.
१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण.
१९५५: पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.
१९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द.
१९७९: शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
१९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.
२००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण.
• मृत्यू:
• १९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)
• १९६६: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८८९)
• १९८८: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ – भागलपूर, बिहार)
• १९९७: कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या.
• २०००: मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत त्रिलोकीनाथ कौल यांचे निधन.
• २००३: सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक रामविलास जगन्नाथ राठी यांचे निधन.
• २००५: संगीतकार, पेटीवाले मेहेंदळे उर्फ श्रीकृष्ण हरी मेहेंदळे यांचे निधन.
• २०१९: रामजन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख नेते आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णु हरी दालमिया यांचे निधन
जन्म :
१९२०: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००२)
१९२६: संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी २००७)
१९४६: चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांचा जन्म.
आपला दिवस मंगलमय जावो