हे कारखाने विकणे वा भाडेतत्त्वावर देणे आहेत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मोठ्या थकबाकीमुळे राज्य सहकारी बँकेचा निर्णय

मुंबई : कर्जाची मोठी रक्कम थकल्यामुळे सहा सहकारी साखर कारखान्यांसह एकूण नऊ सहकारी प्रकल्प विकण्याचा किंवा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. त्यासाठी टेंडर जारी केले आहे.

महेश सहकारी साखर कारखाना (कडा, बीड), शेतकरी सहकारी साखर कारखाना (देवगाव, अमरावती), जिजामाता सहकारी साखर कारखाना (दुसरबीड, बुलढाणा), जयकिसान सहकारी साखर कारखाना (बोधेगाव, यवतमाळ), स्व. बापूरावजी देशमुख सहकारी साखर कारखाना (हिंगणघाट, वर्धा), पांझराकान स. सा. कारखाना (भाडणे, धुळे) अशी या कारखान्यांची नावे आहेत.

याखेरीज शारदा सहकारी सूतगिरी (सोलापूर), योगेश्वरी सहकारी सूतगिरणी (अंबाजोगाई), तालुका सह. दाल मिल (उदगीर) अशी अन्य सहकारी प्रकल्पांची नावे आहेत.

यातील जयकिसान कारखान्यावर सर्वाधिक म्हणजे सुमारे २३४ कोटी थकबाकी असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने म्हटले आहे. त्याखालोखाल सुमारे १३६ कोटींची कर्ज थकबाकी स्व. बापूरावजी देशमुख सहकारी साखर कारखान्यावर आहे.

सविस्तर माहिती खाली दिली आहे….

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »