‘राजाराम’साठी रविवारी मतदान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी पाच तालुक्यातील ५८ मतदान केंद्रांवर २३ एप्रिल रोजी (रविवार) सकाळी आठ ते दुपारी पाच या दरम्यान मतदान होईल. जिल्ह्यातील १२२ गावात पसरलेल्या एकूण १३,३५८ शेतकऱ्यांकडून पुढील पाच वर्षांसाठी २१ संचालकांच्या निवडीसाठी मतदान केले जाणार आहे.

माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे राजर्षी शाहू सहकार आघाडी विरुद्ध आमदार, माजी मंत्री सतेज पाटील राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी या पॅनलमध्ये थेट लढत होत आहे. २५ एप्रिल रोजी कोल्हापुरातील रमणमळा येथील मल्टी पर्पज हॉलमध्ये मतमोजणी होईल.

प्रत्येक बूथवर कमीत कमी १८० मतदार आहेत. कोल्हापूर शहरातील सेंट झेव्हियर्स स्कूलच्या मतदान केंद्रावर सर्वाधिक ३४८ मतदार आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »