मोहनराव शिंदे साखर कारखान्यात अधिकारी पदांसाठी भरती सुरू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : प्रतिदिनी 4000 TCD गाळपक्षमता, 15 मे. वॅट को-जनरेशन प्रकल्प व प्रस्तावित 45 KLPD इथेनॉल प्रकल्प असलेल्या मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि., मोहननगर पोस्ट आरग, ता. मिरज, जि. सांगली येथे ऊस पुरवठा अधिकारी व ऊस विकास अधिकारी या दोन पदांसाठी प्रत्येकी एक एक जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले नोकरी अर्ज जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 07 दिवसांच्या आत md@mohansugar.com  या ई-मेल आयडीवर पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

                 

ऊस पुरवठा अधिकारी  ( ०१ )                                                        

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. / एम.एस्सी. (अॅग्री) तोडणी मजूर भरती व ऊस पुरवठा
                                    कामाचा अनुभव. तसेच संगणक ज्ञान व स्वतःची तोडणी / वाहतूक यंत्रणा असणे आवश्यक.

ऊस विकास अधिकारी( ०१ )          

 शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. / एम.एस्सी. (अॅग्री) ऊस विकास अधिकारी  म्हणून साखर  कारखान्यातील ५ वर्षांचा कामाचा  अनुभव आवश्यक.

टीप : १) वरील पदांसाठी साखर कारखान्यातील संबंधित पदावर किमान ५ ते ७ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. २) आपले अर्ज md@mohansugar. com या ई-मेल आयडीवर पाठवावेत. ३) मुलाखतीच्या वेळी वयाचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र व आधारकार्डची सत्यप्रत सादर करणे आवश्यक आहे. ४) मागासवर्गीय पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »