सोळंके कारखान्यात सुरक्षा अधिकारी पदासाठी भरती

बीड : दैनिक ५००० मे. टन गाळप क्षमता, २२ मेगावॅट को. जन प्रकल्प आणि १५० KLPD डिस्टीलरी प्रकल्प असलेल्या लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यात सुरक्षा विभागात सुरक्षा अधिकारी या पदावर अनुभवी अधिकारी यांची त्वरीत नियुक्ती करावयाची आहे. पात्र उमेदवारांनी कामाचा अनुभव, शैक्षणिक पात्रता, जन्म तारीख, सध्याचा पगार, अपेक्षित पगार या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह आपले अर्ज दिनांक १०/४/२०२६ रोजी पर्यंत कारखाना कार्यालयास पाठवावेत किंवा sundersakhar@gmail.com या ई. मेल आय. डी वर पाठवावेत, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे .
अर्जावर मोबाईल नंबर व ई. मेल आय.डी. पाठवणे आवश्यक आहे. पात्र मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य राहील. तसेच मुलाखतीस येताना आपला बायोडाटा व मुळ कागदपत्रांचा एक सेट सोबत आणने बंधनकारक राहील. खाली नमुद केलेली शैक्षणीक पात्रता, अत्यावश्यक अनुभव असणा-या पात्र उमेदवारांनीच अर्ज करावेत. अपात्र उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
पत्ता – लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर पो. तेलगांव (बु) ता.धारुर जि.बीड
पद – सुरक्षा अधिकारी
पद संख्या – १
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी व माजी सैनिक
आवश्यक अनुभव – सदर पदावर साखर उद्योगात काम केल्याचा कमीत कमी ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक.



