नॅचरल शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

यवतमाळ : नॅचरल उद्योग समूहातील युनिट नं.२ गुंज सवना ता. महागांव जि. यवतमाळ या कारखान्यात सुरक्षा अधिकारी, सुरक्षा सुपरवाझर, सुरक्षा गार्ड या पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संपूर्ण माहिती शैक्षणिक पात्रता, अनुभव, जन्मतारीख प्रमाणपत्र, सध्याचा व अपेक्षित पगारासह ३० जून २०२५ पर्यंत दिलेल्या पत्यावर पोष्टाने अथवा naturalcmd@gmail.com किंवा naturalgadunit2@gmail.com या मेलवर पाठवण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता ः नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि., युनिट क्र. गुंज सावना, ता. महागाव, जि. यवतमाळ. पिन कोड 445205.
पदभरतीचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता अनुभव
१ सुरक्षा अधिकारी पदवीधर, माजी सैनिक ५ वर्षे
२ सुरक्षा सुपरवायझर एस.एस.सी. माजी सैनिक ३ वर्षे
३ सुरक्षा गार्ड एस.एस.सी., माजी सैनिक २ वर्षे
वरील शैक्षणिक पात्रता व किमान अनुभव असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावा. मागासवर्गीय पात्र उमेदवारास प्राधान्य दिले जाईल, याची नोंद घ्यावी.