विश्वासराव नाईक कारखान्यात विविध पदांसाठी भरती

सांगली : आयएसओ 9001-2015 मानांकित उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली कार्यरत असलेल्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची गाळपक्षमता प्रतिदिनी ७ हजार मे. टन आहे. १०५ के. एल. पी. डी. क्षमतेचा आसवणी प्रकल्प व २२ मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहे. कारखान्यातील रिक्त जागा अनुभवी उमेदवारांमधून भरावयाच्या आहेत. पात्र उमेदवारांनी संपूर्ण नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, मूळ कागदपत्र, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, वय, सध्याचा पगार, अपेक्षित पगार इ. तपशिलांसह आपले अर्ज ई मेल करावेत अथवा पोस्टाने दहा दिवसांत पोहोचतील, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता ः विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना लि., यशवंतनगर, पोस्ट: चिखली, तालुका: शिराळा, जिल्हा सांगली.
ईमेल : hrvnsskltd@gmail.com
पदांचा तपशील
अ.क्र. पदांचे नाव शैक्षणिक पात्रता व अनुभव
१. डिस्टिलरी मॅनेजर ०१ बी. एस्सी. (अल्कोहोल टेक) व्ही. एस. आय. पुणे.
२. डेप्यूटी-डिस्टिलरी प्रभारी ०१ बी. एस्सी. (अल्कोहोल टेक) व्ही. एस. आय. पुणे.
३. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (इरिगेशन) ०१ डी. सी. ई. / बी. ई. सिव्हिल /बी. एस्सी अॅग्री / एम. बी. ए. व संगणक ज्ञान आवश्यक
४. लिगल ऑफिसर ०१ कोणत्याही शाखेचा पदवीधर, कायदेविषयक ज्ञान (एलएल. बी.) व संगणक ज्ञान आवश्यक
५. पर्यावरण अधिकारी ०१ बी. एस्सी. / एम. एस्सी. (इन्व्हॉयरमेंट सायन्स) व संगणक ज्ञान आवश्यक.
६. असि. इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर ०३ बी.ई./ डिप्लोमा इन्स्ट्रुमेंट व संगणक ज्ञान आवश्यक
७. इलेक्ट्रिशियन ०४ आय. टी. आय. इलेक्ट्रिशियन कोर्स पास
८. टर्बाईन अटेंडंट ०२ स्टीम टर्बाईन अप्रेंटिस परीक्षा पास. को-जनरेशन कडील बॅक प्रेशर कंडेनशिंग टर्बाईनवरील व टर्बाईन सी. सी. एस. ऑपरेटिंगचा अनुभव आवश्यक.
वरील पदांसाठी किमान ५ ते ७ वर्षांचा साखर कारखाना, डिस्टिलरी व इंजिनिअरिंग विभागाकडील अनुभव आवश्यक आहे.



